Ganguly - the giants of the Giants in day and night test | दिवस-रात्र कसोटीत दिग्गजांची मांदीयाळी- गांगुली
दिवस-रात्र कसोटीत दिग्गजांची मांदीयाळी- गांगुली

कोलकाता : सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर व कपिलदेव यांच्यासह अनेक भारतीय दिग्गज क्रिकेटपटू पहिल्या दिवस- रात्र कसोटीला हजेरी लावणार आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी ही माहिती दिली.

गांगुली म्हणाले, ‘सचिन, गावसकर, कपिल, राहुल द्रविड, अनिल कुंबळे असे सर्वजण येथे असतील. चहापानाच्या वेळेत दिग्गज खेळाडू एका वाहनात बसून मैदानाला फेरी मारतील. यावेळी संगीताची मेजवानी राहणार असून दिवसाचा खेळ संपताच सन्मान सोहळा होईल. या कार्यक्रमात दोन्ही संघ, माजी कर्णधार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना तसेच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होतील. रूना लैला आणि जीत गांगुली हे लोकप्रिय गीतांचा नजराणा सादर करणार असल्याने मी स्वत: उत्सुक आहे. या सामन्यासाठी खूप मोठा उत्साह असून चार दिवसांची तिकीटे आधीच संपली.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Ganguly - the giants of the Giants in day and night test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.