Former Pakistani cricketer Riaz Sheikh dies of coronavirus at 51svg | Shocking : पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा कोरोनामुळे मृत्यू

Shocking : पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा कोरोनामुळे मृत्यू

पाकिस्तान क्रिकेटला मंगळवारी मोठा धक्का बसला. त्यांचा माजी क्रिकेटपटू रियाझ शेख याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. रियाझ शेख हे प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते आणि त्यांचं वय 51 वर्ष होतं. शेख यांनी 43 प्रथम श्रेणी आणि 25 लिस्ट ए क्रिकेट सामने खेळले आहेत.  

शेख यांनी 1987 ते 2005 पर्यंत क्रिकेट खेळले. निवृत्तीनंतर त्यांनी मोईन खान यांच्या अकादमीत गोलंदाज प्रशिक्षण म्हणून काम पाहिले. रियाझ शेखनं 43 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 116 विकेट्स घेतल्या. त्यानं चारवेळा पाच, तर दोन वेळा दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. 60 धावांत 8 विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.  


यापूर्वी कोरोनामुळे पाकिस्तानचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू जाफर सर्फराज याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर हाही कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.  जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 63 लाख 70,762 वर पोहोचली आहे. त्यापैकी 29 लाख 04,690 रुग्ण बरे झाले असले तरी 3 लाख 77,515 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या 76,398 इतकी झाली असून 27110 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1621 जणांचा मृत्यू झाला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन! 

क्रिकेटमध्येही वर्णद्वेष; ख्रिस गेलनं सांगितली आपबीती

लॉकडाऊनमध्ये मजूरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला मोहम्मद शमी; Video Viral 

"युवराज सिंग माफी माग", सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी

मॉडल, अभिनेत्री, IPL चीअरगर्ल... मोहम्मद शमीच्या पत्नीबाबत जाणून घ्या सर्वकाही!

ब्रिस्बनमधील 44,000 निराधार लोकांच्या मदतीला टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाची धाव

समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी

पाकिस्तानचे क्रिकेटपटू सरावाला लागले, पण कोरोनाचं गांभीर्य विसरले

English summary :
Former Pakistan cricketer Riaz Sheikh died of the COVID-19 disease

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Former Pakistani cricketer Riaz Sheikh dies of coronavirus at 51svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.