पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारताच्या दोन माजी क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केल्याचे बुधवारी पाहायला मिळालं. भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी ( Manoj Tiwari) याच्यानंतर गोलंदाज अशोक डिंडा ( Ashok Dinda) यांनी राजकारणात प्रवेश केला. फलंदाज मनोज तिवारी यांना सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला, तर अशोक डिंडानं भाजपात प्रवेश केला. बेन स्टोक्सनं असं केलं तरी काय, की विराट कोहलीला अनावर झाला राग; सुनील गावस्करांनी टोचले कान
३६ वर्षीय गोलंदाज डिंडानं भारताकडून १३ वन डे व ९ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. २००९ मध्ये त्यानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. श्रीलंकेविरुद्ध नागपूर ट्वेंटी-20तून त्यानं पदार्पण केलं. त्यानंतर २०१०मध्ये त्यानं झिम्बाब्वेविरुद्ध पहिला वन डे सामना खेळला. त्यानं १२ वन डे व १७ ट्वेंटी-20 विकेट्स घेतल्या. २०१३नंतर तो टीम इंडियाच्या बाहेर गेला तो गेलाच... अक्षर पटेलनं रचला इतिहास; ३२ वर्षांत एकाही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही, ते करून दाखवलं
त्यानं २०१३नंतर ७ वर्ष प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपला दबदबा राखला. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४२० विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए आणि ट्वेंटी-20त त्याच्या नावावर १५१-१५१ विकेट्स आहेत. याशिवाय त्यानं आयपीएलमध्ये ७८ सामन्यांत ६९ विकेट्स घेतल्या आहेत.
दुसरीकडे फलंदाज मनोज तिवारी यानंही बंगालच्या सिनेस्टारसह तृणमुल काँग्रेसचा हात पकडला. मनोज तिवारीनं १२ वन डेत २८७ धावा आणि ३ ट्वेंटी-20 १५ धावा केल्या आहेत.