वडिलांनी माझ्या डोळ्यांनी स्वर्गातून सचिन तेंडुलकरला प्रत्यक्ष खेळताना पाहिलं, Emotional Photo Viral

Sachin Tendulkar ९०च्या दशकातील क्रिकेट फॅन्स आजही तेंडुलकरला प्रत्यक्ष खेळताना पाहण्यासाठी स्टेडियमवर गर्दी करताना दिसत आहेत. गॉड ऑफ क्रिकेट तेंडुलकरची आजही क्रिकेट चाहत्यांवर मोहिनी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 07:06 PM2021-03-14T19:06:40+5:302021-03-14T19:07:08+5:30

whatsapp join usJoin us
Finally, my father is watching Sachin Tendulkar through my eyes from heaven, Emotional photo viral | वडिलांनी माझ्या डोळ्यांनी स्वर्गातून सचिन तेंडुलकरला प्रत्यक्ष खेळताना पाहिलं, Emotional Photo Viral

वडिलांनी माझ्या डोळ्यांनी स्वर्गातून सचिन तेंडुलकरला प्रत्यक्ष खेळताना पाहिलं, Emotional Photo Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या ( Road Safety World Series) शनिवारी झालेल्या सामन्यात इंडिया लिजंड ( India Legends) संघानं दक्षिण आफ्रिका लिजंड ( South Africa Legends) संघावर ५६ धावांनी विजय मिळवला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) आणि युवराज सिंग ( Yuvraj Singh) यांच्या फटकेबाजीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. तेंडुलकरची जादू अजूनही कमी झालेली नाही. ९०च्या दशकातील क्रिकेट फॅन्स आजही तेंडुलकरला प्रत्यक्ष खेळताना पाहण्यासाठी स्टेडियमवर गर्दी करताना दिसत आहेत. गॉड ऑफ क्रिकेट तेंडुलकरची आजही क्रिकेट चाहत्यांवर मोहिनी आहे. त्यात शनिवारी त्यानं खेळलेल्या खेळीनं अनेकांना बरेच वर्ष मागे नेले. याच सामन्यात एका युवतीच्या हातात झळकलेल्या पोस्टरनं सर्वांचे लक्ष वेधले आणि तेंडुलकरशी तिच्या वडिलांचे नाते किती भावनिक आहे, हेही जगाला कळले. ( my father is watching Sachin Tendulkar through my eyes from heaven)  IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 


या सामन्यात युवीनं 22 चेंडूंत नाबाद 52 धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर इंडिया लिजंड संघानं 20 षटकांत 3 बाद 204 धावांचा डोंगर उभा केला. युवीसह सचिन तेंडुलकरनं 37 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकारासह 60 धावा केल्या. एस बद्रीनाथनं 34 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 42 धावा केल्या. युसूफ पठाण यानंही 10 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारासह 23 धावा कुटल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला ७ बाद १४८ धावाच करता आल्या.  पृथ्वी शॉनं कुटल्या ८ सामन्यांत ८२८ धावा; कॅपवरील 'त्या' नावात शोधू लागलेत यशाचं रहस्य, Photo Viral

पाहा मॅचचे हायलाईट्स
 
सचिन तेंडुलकरनं २०० कसोटी सामन्यांत १५,९२१ धावा केल्या आहेत. त्यात ५१ शतकं व ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. ४६३ वन डे सामन्यांत त्यानं ४४.८३च्या सरासरीनं १८,४२६ धावा केल्या आणि त्यात ४९ शतकं व ९६ अर्धशतकं आहेत. 

Web Title: Finally, my father is watching Sachin Tendulkar through my eyes from heaven, Emotional photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.