Fans Have Identified Jasprit Bumrah’s “GF” And Now They Are Asking Questions On Twitter | अखेर जसप्रीत बुमराहची 'गर्लफ्रेंड' कोण आहे ते कळलं; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

अखेर जसप्रीत बुमराहची 'गर्लफ्रेंड' कोण आहे ते कळलं; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

बॉलिवूड नायिका आणि क्रिकेटपटू यांचं नातं काही नवीन नाही. अगदी शर्मिला टागोर ते आतापर्यंत अनुष्का शर्मा- विराट कोहली आणि अथिया शेट्टी- लोकेश राहुल या क्रिकेटपटू व बॉलिवूड नायिका यांची चर्चा सुरूच आहे. आता या यादीत जसप्रीत बुमराहचाही समावेश झाला आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या एका ट्विटने त्याच्या गर्लफ्रेंडचा नेटिझन्सने शोध लावला. 

जसप्रीतनं 18 फेब्रुवारीला त्याच्या ट्विटवर एक पोस्ट केली होती. त्यात तो व्हिडीओ गेम खेळताना दिसत आहे आणि त्याखाली त्यानं लिहलं की, लवकर मोठे होऊ नका, हा एक सापळा आहे. त्याच दिवशी दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरननं तिचा 24 वा वाढदिवस साजरा केला. आता नेटिझन्सनी या दोन गोष्टी जोडून जसप्रीत आणि अनुपमा यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा सुरू केल्या.

प्रेमाम या चित्रपटातून अनुपमा प्रसिद्धीस आली. मलयालम, तामीळ आणि तेलुगु चित्रपट सृष्टींत अनुपमा ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या काही महिन्यांपासून जसप्रीत व अनुपमा एकमेकांना डेट करत असल्याच्याची चर्चा रंगल्या होत्या. पण, अनुपमानं या सर्व अफवा असल्याचे सांगून नेटिझन्सच्या चर्चांना पूर्णविराम लावला. तरीही जसप्रीतच्या त्या ट्विटमुळे या चर्चा अधिक रंगताना दिसत आहेत.  


नेटिझन्सच्या चर्चा
 

English summary :
Jasprit Bumrah who has created a stir on social media with the speculations regarding his relationship rumors with actress Anupama Parameswaran.

Web Title: Fans Have Identified Jasprit Bumrah’s “GF” And Now They Are Asking Questions On Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.