बंदीनंतर मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉचे धमाकेदार पुनरागमन; साकारली तुफानी खेळी

उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घालण्याता निर्णय बीसीसीआयने घेतला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 03:00 PM2019-11-17T15:00:34+5:302019-11-17T15:02:49+5:30

whatsapp join usJoin us
The explosive return of prithvi Shaw after the ban | बंदीनंतर मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉचे धमाकेदार पुनरागमन; साकारली तुफानी खेळी

बंदीनंतर मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉचे धमाकेदार पुनरागमन; साकारली तुफानी खेळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर काही दिवसांपूर्वी उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली. पण ही बंदी उठल्यावर पृथ्वी आज मैदानात उतरला आणि त्याने तुफानी खेळी साकारत दमदार पुनरागमन केले.

उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घालण्याता निर्णय बीसीसीआयने घेतला होता. आज पृथ्वीवरील बंदी उठली आणि त्याने दिमाखात पुनरागमन केले आहे.

बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत पृथ्वीने धडाकेबाज फलंदाजी करत आपले पुनरागमन साजरे केले. मुंबईचा आज आसामविरुद्ध सामना होता. या सामन्यात पृथ्वीने ३९ चेंडूंमध्ये ६३ धावांची जबरदस्त खेळी साकारली. या खेळीमध्ये त्याने सात चौकार आणि दोन षटकारांची बरसात केली. पृथ्वीच्या दमदा फलंदाजीच्या जोरावर मुंबईला २०५ धावांचा डोंगर उभारता आला. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना आसामला १२३ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना ८३ धावांनी जिंकला. 

Web Title: The explosive return of prithvi Shaw after the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.