IND W vs ENG W 2nd T20I : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं इंग्लंडच्या ब्रिस्टलच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामना जिंकत नवा इतिहास रचला आहे. या विजयासह भारतीय महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्ज आणि अमनजोत कौर या दोघींनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर १८२ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना यजमान इंग्लंड महिला संघ १५७ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं
आतापर्यंत इंग्लंडच्या संघानं ब्रिस्टलच्या मैदानात खेळवण्यात आलेला एकही सामना गमावला नव्हता. पण त्यांची या मैदानातील बादशाहत टीम इंडियानं मोडून काढली. जे कुणाला जमलं नाही ते हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं करुन दाखवलं. भारतीय संघ याआधीही या मैदानात खेळला होता. पण दुसऱ्या सामन्यात संघाने इथं पहिल्या विजयाचा डाव साधला. भारतीय संघ टी-२० क्रिकेटमध्ये ब्रिस्टलच्या मैदानात इंग्लंडला पराभूत करणारा पहिला संघ ठरला आहे.
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
ब्रिस्टलच्या मैदानातील इंग्लंडचा रेकॉर्ड
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध - इंग्लंड संघाचा २२ धावांनी विजय (२०११)
- पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघाचा ६८ धावांनी विजय (२०१६)
- न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघाचा ७ विकेट्स राखून विजय (२०१८)
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध - इंग्लंड संघाचा १७ धावांनी विजय (२०१९)
- भारत विरुद्ध इंग्लंड संघाचा ७ विकेट्स राखून विजय (२०२२)
- भारत विरुद्ध - इंग्लंड संघाचा २४ धावांनी पराभूत (२०२५)*
जेमिमासह अमनजोत कौरची अर्धशतके
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात सलामीवीर स्मृती मानधनासह शेफाली वर्मा स्वस्तात माघारी फिरल्यावर जेमिमा रॉड्रिग्जनं ४१ चेंडूत ६३ धावांची दमदार खेळी केली. याशिवाय अमनजोत कौर (Amanjot Kaur) हिने ४० चेंडूत ६३ धावांची दमदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकात विकेट किपर बॅटर रिचा घोष हिने ३२ धावांची उपयुक्त खेळी केली.
Web Title: ENG vs IND W 2nd T20I India Made History Become First Team To Beat England At Bristol
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.