ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'

कोण आहे तो गोलंदाज? का मिळाली नाही प्लेइंग इलेव्हनमद्ये संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:42 IST2025-06-30T20:41:09+5:302025-06-30T20:42:17+5:30

whatsapp join usJoin us
ENG vs IND England Announced Playing 11 For Second Test Against Team India At Birmingham Edgbaston | ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'

ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG, 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना बर्मिंघमच्या एजबेस्टन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. २ जुलै पासून रंगणाऱ्या या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाने दोन दिवस आधीच आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. दुसऱ्या कसोटी आधी संघ जाहीर केल्यावर ज्या स्टार गोलंदाजाचा गाजावाजा झाला त्याला मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्याचे दिसत नाही.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कोण आहे तो गोलंदाज? का मिळाली नाही प्लेइंग इलेव्हनमद्ये संधी?

मोठा गाजावाजा करत इंग्लंडच्या ताफ्यात सामील झालेला गोलंदाज हा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे जोफ्रा आर्चर. ४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला इंग्लंडच्या संघात स्थान मिळाले होते. टीम इंडियाविरुद्ध तो दमदार कमबॅक करेल, अशी चर्चाही रंगली. पण आता तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. जोफ्रा आर्चर संघाबाहेर असला की, त्याला काही दुखापत झालीये का? हा प्रश्नही आपसूक चर्चेत येतो. पण सध्या जी माहिती समोर आलीये ते यामागच कारण नसल्याचे समजते. कौटुंबिक कारणास्तव त्याला दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. नेमंक कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.

'चायनामन' खरंच टीम इंडियासाठी फायद्याचा ठरु शकतो का? इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड भारी, पण...

कमबॅक लांबणीवर
 
३० वर्षीय जोफ्रा आर्चर याने  फेब्रुवारी २०२१ मध्ये टीम इंडियाविरुद्धच अखेरचा कसोटी सामना खेळला होता. २०१९ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या जोफ्रानं आतापर्यंत फक्त १३ कसोटी सामने खेळले आहेत. मागच्या आठवड्यात आर्चर चार वर्षांनी पहिल्यांदा काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत डरहॅम संघाविरुद्ध  ससेक्सकडून प्रथम श्रेणी सामना खेळला होता. दुसऱ्या सामन्याला मुकल्यावर तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला कमबॅकची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, ⁠जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

Web Title: ENG vs IND England Announced Playing 11 For Second Test Against Team India At Birmingham Edgbaston

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.