IPL 2021 MI vs CSK: बर्थडे साजरा करणाऱ्या क्रिकेटरची भविष्यवाणी; MI आणि CSK मध्ये कुठली टीम बाजी मारणार?  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 03:40 PM2021-09-19T15:40:34+5:302021-09-19T15:41:17+5:30

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना रंगतदार होणार आहे. मात्र या दोन टीममध्ये बाजी कोण मारणार याची उत्सुकता तुम्हालाही असेल ना?

CSK VS MI IPL 2021: Big IPL Prediction by birthday boy Aakash Chopra , Who will win the match | IPL 2021 MI vs CSK: बर्थडे साजरा करणाऱ्या क्रिकेटरची भविष्यवाणी; MI आणि CSK मध्ये कुठली टीम बाजी मारणार?  

IPL 2021 MI vs CSK: बर्थडे साजरा करणाऱ्या क्रिकेटरची भविष्यवाणी; MI आणि CSK मध्ये कुठली टीम बाजी मारणार?  

Next

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धला दिमाखात सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिली मॅच खेळली जाईल. IPL मधील दोन दिग्गज टीममध्ये तगडा मुकाबला होणार आहे. एकीकडे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स(Chennai Super Kings ) आणि दुसरीकडे मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) मैदानात उतरणार आहेत.

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना रंगतदार होणार आहे. मात्र या दोन टीममध्ये बाजी कोण मारणार याची उत्सुकता तुम्हालाही असेल ना? १९ सप्टेंबर रोजी ४४ वा वाढदिवस साजरा करणारे माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर आकाश चोपडा यांनी मॅचबद्दल भविष्यवाणी केली आहे. चेन्नई आणि मुंबई या टीममध्ये आजच्या मॅचमध्ये बाजी कोण मारणार याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. आकाश चोपडाने यूट्यूब चॅनेलवरुन चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात विजयाची हॅट्रीक मुंबई इंडियन्स करु शकतं अशी भविष्यवाणी केली आहे.

मागील २ लढतीत मुंबईनं चेन्नईवर मात केली होती. आकाश चोपडा म्हणाले की, आयपीएल २०२१ चा UAE एडिशन मुंबई इंडियन्स जिंकणार आहे. चोपडा यांच्या या भविष्यवाणीनं धोनी आणि सीएसके(CSK) फॅन्समध्ये राग व्यक्त करण्यात येत आहे. चोपडा यांची भविष्यवाणी इथेच संपत नाही तर IPL २०२० मध्ये UAE स्लो पिचवर CSK फलंदाजीसाठी संघर्ष करताना पाहायला मिळाली. ज्याचा फायदा विरोधी टीम झाला होता. यंदाही असेच पाहायला मिळू शकते असं त्यांनी सांगितले आहे.

चेन्नईविरोधात मुंबईत बाजी मारेल

चेन्नईविरोधात मुंबई इंडियन्स जिंकेल अशी भविष्यवाणी करून चर्चेत येणारे बर्थडे बॉय पुढे म्हणाले की, चेन्नई टीमसाठी रवींद्र जडेजा आणि औकर मोइन अली यांची भूमिका महत्त्वाची असेल. मोइन चेन्नई टीमशी जोडल्यामुळे तिसऱ्या फलंदाजाची चिंता मिटली आहे. त्याशिवाय टीमकडे गौतमदेखील चांगला पर्याय आहे. तर मुंबई इंडियन्ससाठी राहूल चहरची भूमिका महत्त्वाची आहे. त्याशिवाय जयंत यादव, पीयूष चावला हेदेखील पर्याय आहेत. मुंबई आणि चेन्नई यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या मॅचमध्ये पहिला चौकार कधी लागेल याचीही भविष्यवाणी करण्यात आली आहे. पहिल्या १० चेंडूत चौकार लागेल तर मॅचमध्ये पहिल्या ४ ओव्हरआधी विकेट पडेल असंही आकाश चोपडाने सांगितले आहे.

आकाश चोपडासह वीरेंद्र सहवागही मुंबई इंडियन्सच्या बाजूने आहे. आकाश चोपडाने यापूर्वीही एक भविष्यवाणी केली होती. त्यात त्याने IPL 2021 चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात खेळला जाण्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु सोशल मीडियावर लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना अंतिम सामन्यात विजेता कोण असेल हे सांगता येत नसल्याचं म्हटलं होतं.  

Web Title: CSK VS MI IPL 2021: Big IPL Prediction by birthday boy Aakash Chopra , Who will win the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app