CSK vs KKR Latest News : रवींद्र जडेजाला भज्जी म्हणाला, चित्ता...; ही भन्नाट कॅच पाहून तुम्हाला कळेल कारण!

CSK vs KKR Latest News : कोलकाता नाइट रायडर्ससाठी आजच्या सामन्यात सुनीन नरीनच्या जागी राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRच्या डावाची सुरुवात केली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 7, 2020 08:42 PM2020-10-07T20:42:29+5:302020-10-07T20:54:03+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs KKR Latest News : Brilliant from Ravindra Jadeja! Pulls off a sensational diving catch and Narine has to depart, Video  | CSK vs KKR Latest News : रवींद्र जडेजाला भज्जी म्हणाला, चित्ता...; ही भन्नाट कॅच पाहून तुम्हाला कळेल कारण!

CSK vs KKR Latest News : रवींद्र जडेजाला भज्जी म्हणाला, चित्ता...; ही भन्नाट कॅच पाहून तुम्हाला कळेल कारण!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगत आहे. गुणतक्त्यात ( Point Table) KKR व CSK प्रत्येकी 4 गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे. CSKची कामगिरी समाधानकारक झाली नसली तर किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी एकहाती सामना जिंकला. त्यामुळे CSKचे मनोबल उंचावले आहे. दुसरीकडे KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक याला संघाची घडी नीट बसवता येत नाही. इयॉन मॉर्गनच्या फलंदाजी क्रमवारीवरून त्याच्यावर टीका होत आहे, शिवाय सुनील नरीनचा फॉर्म हा संघासाठी चिंतेची बाब बनली होती. त्यामुळे KKRने आज त्यांचा फलंदाजांचा क्रमच बदलला. 

कार्तिकनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाइट रायडर्सनं यापूर्वी मे २०१५ मध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच ६९ सामन्यांनंतर KKRनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( २०१५) कोलकातानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि कोलकातानं तो सामना १५ धावांनी जिंकला. या सामन्यात पीयूष चावला ( ४/३२) मॅन ऑफ दी मॅच ठरला होता. 

आजच्या सामन्यात सुनीन नरीनच्या जागी राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRच्या डावाची सुरुवात केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ३७ धावा जोडल्या. शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) गिलला माघारी पाठवलं. त्यानंतर आलेल्या नितिश राणाला आज पहिला सामना खेळणाऱ्या कर्ण शर्मानं बाद केलं. राहुल त्रिपाठीनं दमदार खेळ करताना अर्धशतक पूर्ण केलं. सलामीला अपयशी ठरत असलेल्या सुनील नरीनला चौथ्या क्रमांकावर येऊनही मोठी खेळी करता आली नाही. क्षेत्ररक्षणात चपळ असलेल्या रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) सीमारेषेवर डाईव्ह घेत नरीनचा झेल टिपला, परंतु हात बाऊंड्री लाईनला लागेल हे लक्षात येताच त्यानं तो फॅफ ड्यू प्लेसिसकडे सोपवला आणि KKR ला धक्का दिला.

पाहा व्हिडीओ..

 

Web Title: CSK vs KKR Latest News : Brilliant from Ravindra Jadeja! Pulls off a sensational diving catch and Narine has to depart, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.