ड्रगचे सेवन केल्याप्रकरणी वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागलेल्या इंग्लंडचा अॅलेक्स हेल्स आणखी एका अडचणीत सापडला आहे. यावेळी वैयक्तिक आयुष्यात त्याच्यावर संकट ओढावले आहे आणि त्याला कारणीभूतही तोच आहे. हेल्स हा गेली अनेक वर्ष डॅनी गिसबोर्नसोबत रिलेशनशीपमध्ये होता. पण, तो एका दुसऱ्याच मुलीसोबत सेक्स करताना रंगे हात पकडला गेला. त्यानंतर गिसबोर्ननं टोकाचं पाऊल उचललं.
हेल्स 10 मार्च 2019मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. हेल्सच्या अशा दुटप्पी वागण्यामुळेच गिसबोर्नने त्याच्याशी संबंध तोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. 26वर्षीय गिसबोर्न हेल्ससोबत सुट्टीसाठी कॅरेबियन दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यावर त्यांच्यासोबत असलेल्या अन्य सदस्यांनी हेल्सच्या या प्रतापाबद्दल गिसबोर्नला सांगितले. आपला विश्वासघात झाल्याचे समजताच गिसबोर्न ढसाढसा रडली. गिसबोर्नने याआधीही हेल्सला आपली वागणूक सुधरण्यास सांगितले होते. पण, हेल्स काही सुधरला नाही. गिसबोर्न आणि हेल्स हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
गिसबोर्न हीनं या प्रकरणाबद्दल हेल्सला विचारले, परंतु त्यानं नकार दिला. हेल्सनं पुन्हा गिसबोर्नचा विश्वास जिंकला होता. पण, गिसबोर्नने स्वतःच्या डोळ्यानं हेल्सला दुसऱ्या मुलीसोबत सेक्स करताना रंगे हात पकडले. त्यानंतर गिसबोर्नने थेट लंडन गाठले आणि हेल्सशी संर्व संबंध तोडले.