Cricketer Harmeet Singh's mother Paramajeet Kaur passed away due to COVID19 | भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूच्या आईचे कोरोनामुळे निधन

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूच्या आईचे कोरोनामुळे निधन

भारताला २०१२मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या फिरकीपटू हरमीत सिंह याच्या आईचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. परमजीत कौर असं त्याच्या आईचं नाव असून त्या ५६ वर्षांच्या होत्या. 

हरमीत सिंह २०१३मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. त्यानं ३१ प्रथम श्रेणी, १९ लिस्ट ए आणि ७ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ७६ विकेट्स आहेत.२०१८-१९च्या विजय हजारे ट्रॉफीत त्रिपुराकडून सर्वाधिक १३ विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्यानं केला होता. हरमीत सिंह यानं मद्यधुंद अवस्थेत अंधेरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडी घुसवली होती आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाईही केली होती. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cricketer Harmeet Singh's mother Paramajeet Kaur passed away due to COVID19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.