मुंबई : एखादी व्यक्ती काय करेल आणि त्याच्याबाबत काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. क्रिकेटपटू हा जंटलमन असतो, असे म्हटले जाते. पण एका क्रिकेटपटू आपल्या पत्नीसह चक्क तुरुंगवास भोगून आल्याचे वृत्त आता समोर आले आहे.

हा खेळाडू सध्या मारहाण केल्यामुळे चर्चेत आला आहे. आपल्या संघातील एका खेळाडूला त्याने शुल्लक कारणावरून मारहाण केल्याचे वृत्त सर्वत्र प्रकाशित झाले आहे. या गोष्टीमुळे त्याला मोठी शिक्षाही सुनावण्यात आली आहे. पण यापूर्वी आपल्या घरातील ११ वर्षीय मोलकरणीला त्रास दिल्यामुळे या क्रिकेटपटूला आपल्या पत्नीसह जेलची हवा खावी लागली होती. हा खेळाडू आहे बांगलादेशचा शहादत होसैन. आपल्या सहकाराऱ्याला मारहाण केल्यामुळे आथा होसैनवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

बंदीची कारवाई झाली आहे. शिवाय त्याला जवळपास 2.5 लाख दंड म्हणून भरावे लागणार आहेत.
क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंमध्ये होणारे वाद ही काही नवीन बाब नाही, परंतु आपल्याच सहकाऱ्यारा चोप देण्याचा प्रकार कदाचित प्रथमच घडला असावा. बांगलादेशच्या क्रिकेटपटू शहादत होसैन यानं आपल्याच सहकाऱ्याला शुल्लक कारणास्तव मारहाण केली आणि आता त्याच्यावर एका वर्षांच्या बंदीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. सहकाऱ्यानं चेंडू नीट साफ केला नाही, म्हणून शहादतनं ही मारहाण केली आणि हा प्रकार नॅशनल क्रिकेट लीग दरम्यान घडला.
नॅशनल लीगमध्ये ढाका विभाग आणि खुलना विभाग यांच्यात सामना सुरू होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शहादतनं नाराजी प्रकट करताना सहकारी अराफट सन्नीला मारहाण सुरू केली. त्यानंतर या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. या घटनेनंतर शहादतनं त्याची बाजूही मांडली होती. तो म्हणाला,''माझे रागावरील नियंत्रण सुटले हे खरे आहे, परंतु त्यानेही माझ्यासोबत गैरवर्तणूक केली. त्यानं चेंडू साफ करण्यास मनाई केली आणि याचा जाब जेव्हा विचारला, तेव्हा त्याचा उद्धटपणा मला आवडला नाही.''
आता शहादतला पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यात दोन वर्षांच्या निलंबनाचा समावेश आहे. शिवाय त्याला 3 लाख टका ( भारतीय रकमेत 2.5 लाख रुपये) दंड भरावा लागणार आहे. होसैननं बांगलादेशकडून 38 कसोटी सामन्यांत 72 विकेट्स घेतल्या आहेत. 51 वन डे सामन्यांत त्याच्या नावावर 47 विकेट्स आहेत.