Video: बापरे.... खतरनाक !! फलंदाजाने मारला षटकार, चेंडू वेगाने जाऊन मुलीच्या लागला अन्...

crickt ball hit girl video : फलंदाजाने मारलेला फटका थेट सामना पाहण्यासाठी आलेल्या एका मुलीला लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:19 IST2025-07-11T14:06:11+5:302025-07-11T14:19:51+5:30

whatsapp join usJoin us
cricket ball hit girl video lady got injured vitality blast men t20 league sussex vs kent social media trending | Video: बापरे.... खतरनाक !! फलंदाजाने मारला षटकार, चेंडू वेगाने जाऊन मुलीच्या लागला अन्...

Video: बापरे.... खतरनाक !! फलंदाजाने मारला षटकार, चेंडू वेगाने जाऊन मुलीच्या लागला अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

व्हाइटॅलिटी ब्लास्ट टी२० लीग दरम्यान, एका फलंदाजाने मारलेला फटका थेट सामना पाहण्यासाठी आलेल्या एका मुलीला लागला. चेंडू तिच्या हाताला लागला, ज्यामुळे ती वेदनेने ओरडली. चेंडू तिच्या चेहऱ्यावर किंवा डोक्यावर लागला नाही हे चांगले झाले, अन्यथा दुखापत खूप गंभीर असू शकली असती. जवळ बसलेल्या लोकांनी मुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली. केंट आणि ससेक्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. केंटच्या डावादरम्यान, त्यांच्या एका फलंदाजाने षटकार मारला जो थेट सामना पाहण्यासाठी आलेल्या मुलीच्या हाताला लागला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कसा लागला चेंडू... पाहा व्हिडीओ

केंटच्या डावातील चौथ्या षटकात ही घटना घडली. ऑली रॉबिन्सनने ससेक्ससाठी चौथे षटक टाकले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर केंटचा सलामीवीर डॅनियल बेल ड्रमंडने एक जबरदस्त षटकार मारला. चेंडू थेट स्टेडियममधील स्टँडमध्ये बसलेल्या एका मुलीच्या हाताला लागला, जी सामना पाहण्यासाठी आली होती. यामुळे ती वेदनेने ओरडू लागली. आजूबाजूच्या लोकांनी मुलीला प्रकृतीबद्दल विचारले तेव्हा तिने इशारा केला की सर्व काही ठीक आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ-


सामन्यात काय घडलं?

व्हाटॅलिटी ब्लास्ट टी२० लीग सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण ससेक्स संघ २० षटकांत १४८ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. संघाकडून टॉम क्लार्कने २० चेंडूंत सर्वाधिक २९ धावा केल्या. याशिवाय ऑली रॉबिन्सनने १४ चेंडूंत जलद २७ धावा केल्या. जेम्स क्लोजने १४ चेंडूंत २४ धावा केल्या. केंटकडून नाथन गिलख्रिस्टने ३.५ षटकांत ४२ धावा देत चार विकेट घेतल्या. फ्रेड क्लासेनला दोन विकेट मिळाल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केंटच्या संघाने १९.३ षटकांत ८ गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. केंटकडून जॉय इव्हिसनने २४ चेंडूत सर्वाधिक ४८ धावा केल्या. सलामीवीर डॅनियल बेल ड्रमंडने ३६ चेंडूत ४७ धावा केल्या. ससेक्सकडून टायमल मिल्सने ३.३ षटकांत २२ धावा देत तीन विकेट घेतल्या.

Web Title: cricket ball hit girl video lady got injured vitality blast men t20 league sussex vs kent social media trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.