Wow : ख्रिस गेलचं शतक; CPL मध्ये 39 षटकांत पडला 483 धावांचा पाऊस

या सामन्यात तब्बल 37 षटकारांची आतषबाजी झाली आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात इतके षटकार लागण्याची ही दुसरी वेळ ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 09:26 AM2019-09-11T09:26:15+5:302019-09-11T09:26:25+5:30

whatsapp join usJoin us
CPL 2019 : Jamaica Tallawahs's Chris Gayle ton; St Kitts and Nevis Patriots chase down 242 runs | Wow : ख्रिस गेलचं शतक; CPL मध्ये 39 षटकांत पडला 483 धावांचा पाऊस

Wow : ख्रिस गेलचं शतक; CPL मध्ये 39 षटकांत पडला 483 धावांचा पाऊस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जमैका, कॅरेबियन प्रीमिअर लीग : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी धावांचा पाऊस पडला. युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलनं खणखणीत शतकी खेळी करून ट्वेंटी-20 क्रिकेटमधील शतकांची संख्या 22 वर नेली. मात्र, त्याची शतकी खेळी व्यर्थ ठरवत सेंट किट्स अॅण्ड नेव्हील्स पॅट्रोओट्स संघाने बाजी मारली. जमैका थलावाज आमि पॅट्रोओट्स संघांमधील या सामन्यात तब्बल 39 षटकांत 483 धावांचा पाऊस पडला. विशेष म्हणजे या सामन्यात तब्बल 37 षटकारांची आतषबाजी झाली आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात इतके षटकार लागण्याची ही दुसरी वेळ ठरली.

जमैका संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 241 धावा चोपल्या. ख्रिस गेलनं 62 चेंडूंत 7 चौकार व 10 षटकार खेचून 116 धावांची खेळी केली. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्याचे हे 22 वे शतक ठरले. त्याला चॅडवीक वॉल्टनची सुरेख साथ लाभली. त्यानं 36 चेंडूंत 3 चौकार व 8 षटकारांसह 73 धावांची खेळी साकारली. पॅट्रोओट्सच्या फॅबीयन अॅलन ( 2/30) आणि अल्झारी जोसेफ ( 2/39) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


पॅट्रीओट्सने हे लक्ष्य 18.5 षटकांत 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. डेव्हॉन थॉमस आणि एव्हीन लुईस यांनी दमदार सुरुवात करताना जमैका संघाच्या गोलंदाजांना हतबल केले. या दोघांनी अवघ्या 33 चेंडूंच 85 धावांची भागीदारी केली. थॉमसने 40 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकार खेचून 71 धावा केल्या, लुईसने CPL मधील सर्वात जलद अर्धशतक ठोकले. त्यानं 18 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकारांसह 53 धावांची खेळी साकारली. त्यानंतर लॉरी इव्हान्स आणि थॉमस यांनी 40 चेंडूंत 76 धावांची भागीदारी केली. इव्हान्सने 20 चेंडूंत 41 धावा कुटल्या आणि त्यात 2 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. अॅलननेही 15 चेंडूंत 37* ( 5 चौकार व 2 षटकार ) आणि शामराह ब्रुक्स 15 चेंडूंत 27 (3 चौकार व 1 षटकार) धावा चोपल्या. 

या सामन्यात 37 षटकारांची आतषबाजी झाली. यापूर्वी 2018मध्ये अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमध्ये बल्ख लीजंट्स आणि काबुल झ्वानन यांच्यातील सामन्यात 37 षटकार खेचले होते. 

Web Title: CPL 2019 : Jamaica Tallawahs's Chris Gayle ton; St Kitts and Nevis Patriots chase down 242 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.