Corona Virus : गरजूंना धान्यवाटप करताना शाहिद आफ्रिदीकडून 'गंभीर' चूक, पाहा व्हिडीओ

पाकिस्तानातील गरजवंतांसाठी शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन काम करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 03:01 PM2020-04-10T15:01:28+5:302020-04-10T15:02:45+5:30

whatsapp join usJoin us
Corona Virus: Shahid Afridi makes 'serious' mistake while giving food to needy, watch video svg | Corona Virus : गरजूंना धान्यवाटप करताना शाहिद आफ्रिदीकडून 'गंभीर' चूक, पाहा व्हिडीओ

Corona Virus : गरजूंना धान्यवाटप करताना शाहिद आफ्रिदीकडून 'गंभीर' चूक, पाहा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानातील अनेक भागांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजंदारी कामगारांवर उपसामारीची वेळ आली आहे.  पाकिस्तानाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पाकमधील गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम करत आहे. त्याच्या या समाजकार्याचे भारताचे क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी कौतुक केलं. आफ्रिदी फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहनही भारतीय क्रिकेटपटूंनी केलं. 

आफ्रिदी फाऊंडेशनच्या वतीनं गुरुवारीत मलकंद विभागात 500 कुटंबीयांना धान्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी आफ्रिदी स्वतः तेथे उपस्थित होता. हे धान्य वाटप करताना मास्क त्याच्या तोंडावर दिसत नाही. शिवाय का कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं जाणवलं. येथे लोकांनीही सोशल डिस्टंसिंगच पालन केलं नाही आणि त्यामुळे पाकिस्तानात कोरोना रुग्णाची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाहा व्हिडीओ...


आफ्रिदी फाऊंडेशननं आतापर्यंत 2000 हून अधिक लोकांना धान्य वाटप केलं आहे. त्याच्या फाऊंडेशननं पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांकांनाही म्हणजेच हिंदू आणि ख्रिस्टन वस्तीतही धान्य वाटप केलं. त्याच्या या कृतीचं सर्वांनी कौतुक केलं.

 

अऩ्य महत्त्वाच्या बातम्या

Good News : IPL 2020 होणार; BCCI नं तयार केला 'मास्टर प्लान'!

Corona Virus : IPL चॅम्पियन संघाची कोट्यवधींची मदत; अन्य संघ घेणार का आदर्श?

Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टरच नव्हे, तर खेळाडूही आले मदतीला

अजिंक्य रहाणेच्या चिमुकलीला 'लॉकडाऊन' कळतं, तुम्हाला कधी कळणार? पाहा Cute Video

धवनने लॉकडाऊनचा नियम मोडला; पोलिसांनी पावती फाडली

Web Title: Corona Virus: Shahid Afridi makes 'serious' mistake while giving food to needy, watch video svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.