India China Faceoff: CSKच्या डॉक्टरचं वादग्रस्त ट्विट; फ्रँचायझीकडून त्वरित निलंबनाची कारवाई

चेन्नई सुपर किंग्स संघानं बुधवारी संघाचे डॉक्टर मधू थोट्टाप्पिलील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:43 PM2020-06-17T12:43:23+5:302020-06-17T12:44:08+5:30

whatsapp join usJoin us
Chennai Super Kings suspend team doctor for his distasteful tweet on Indian soldiers’ martyrdom | India China Faceoff: CSKच्या डॉक्टरचं वादग्रस्त ट्विट; फ्रँचायझीकडून त्वरित निलंबनाची कारवाई

India China Faceoff: CSKच्या डॉक्टरचं वादग्रस्त ट्विट; फ्रँचायझीकडून त्वरित निलंबनाची कारवाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) चेन्नई सुपर किंग्स संघानं बुधवारी संघाचे डॉक्टर मधू थोट्टाप्पिलील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मधू यांनी भारताचा शहीद जवानांवरून वादग्रस्त ट्विट केलं होतं. CSKनं त्याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई केली. मधू यांनी वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट केलं होतं.

भारत आणि चीन सैनिकांमध्ये १५ आणि १६ जून रोज गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. या परिसरात तैनात असलेले  जवान जखमी झाले आहेत. त्यातील २० जणांन शहीद झाले. भारतीय सूत्रांनुसार चीनच्या ४३ सैनिकांपैकी काहींचा मृत्यू तर काही गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. मधू यांनी ट्विट केलं की,''शहीद जवानांची शव पेटी  PM CARES चे स्टीकर्स लावून येतायत का?''


त्यांच्या या ट्विटची ताक्ताळ दखल घेत, CSKनं त्यांची हकालपट्टी केली. ''डॉ. मधू थोट्टाप्पिलील यांच्या ट्विटशी चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाशी काही संबंध नाही. त्यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे. संघ व्यवस्थापनाला कोणतीही कल्पना न देऊन त्यांनी केलेल्या ट्विटबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो,''असे CSKनं ट्विट केलं. दरम्यान, मधू यांनीही त्यांचं ट्विट डिलीट केलं.

 

विराट कोहली, रोहित शर्मासह क्रीडा विश्वानं शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली 

54 लाख लोकांनी पाहिलंय 'या' पठ्ठ्याचं सेलिब्रेशन; असं आहे तरी काय Viral Videoत?

बाबो; अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचे 'एलियन'नं केलेलं अपहरण; खेळाडूचा धक्कादायक दावा

Web Title: Chennai Super Kings suspend team doctor for his distasteful tweet on Indian soldiers’ martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.