विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL

Virat Kohli Bus Driver Video: व्हिडिओमध्ये ड्रायव्हरने वापरलेली पद्धत तुफान व्हायरल झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:40 IST2025-12-27T16:37:06+5:302025-12-27T16:40:27+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
bus driver uses crazy trick to take video of Virat Kohli idea goes viral on social media | विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL

विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL

Virat Kohli Bus Driver Video: यावर्षीची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा अनेक प्रकारे खास ठरत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांच्या उपस्थितीने त्याच्या भव्यतेत भर पडली आहे. सोशल मीडियावर या दोघांचे असंख्य व्हिडिओ फिरत आहेत. यादरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दिल्ली संघाच्या बस ड्रायव्हरने विराट कोहलीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी एक मजेदार पद्धत वापरली आहे. या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये ड्रायव्हरने वापरलेली पद्धत तुफान व्हायरल झाली असून, त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

गुजरातविरूद्धच्या सामन्यानंतर व्हिडीओ व्हायरल

विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्ली संघातून देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आणि आतापर्यंतच्या स्पर्धेत संघाच्या दोन विजयांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा स्टार फलंदाज सध्या ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेची तयारी करत आहे. कोहलीने बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे दिल्लीसाठी दोन्ही सामने खेळले. २६ डिसेंबरला शुक्रवारी दिल्लीने गुजरातविरुद्ध विजय मिळवल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला.

हुशारीने चित्रित केला व्हिडिओ

व्हिडिओ क्लिपमध्ये बस ड्रायव्हर हुशारीने स्वतःला विराट कोहलीला आणि दिल्ली संघातील इतर खेळाडूंना एकाच फ्रेममध्ये कैद करण्यासाठी त्याचा फोन एका बाजूला ठेवताना दिसत आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे ड्रायव्हरने पूर्णपणे गंभीर हावभाव राखला आणि कोणताही उत्साह किंवा कौतुक दाखवले नाही, जेणेकरून कोणालाही समजू नये की शूटिंग सुरु आहे. विराट कोहलीसोबत ड्रायव्हरने इशांत शर्मा आणि दिल्ली संघातील इतर अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना बसमधून उतरतानाही कॅमेऱ्यात कैद केले.

दरम्यान, सोशल मीडियावरील चाहत्यांनी या व्हिडिओचे कौतुक केले आणि ड्रायव्हरच्या मजेशीर अभिनयाबद्दल धमाल कमेंट्सदेखील केल्या.

Web Title : विराट कोहली के लिए बस ड्राइवर का अनोखा वीडियो वायरल।

Web Summary : विराट कोहली का वीडियो बनाने के लिए दिल्ली के बस ड्राइवर का अनोखा तरीका वायरल हो गया। चुपके से वीडियो बनाने के तरीके ने प्रशंसकों को प्रभावित किया।

Web Title : Bus driver's clever video trick featuring Virat Kohli goes viral.

Web Summary : A Delhi bus driver's innovative method to record Virat Kohli exiting the team bus has become a viral sensation. His discreet filming impressed fans.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.