brian lara want to see devdutt padikkal to score a hundred in ipl 2021 | IPL 2021: ब्रायन लाराला भारताच्या 'या' युवा क्रिकेटपटूचं आयपीएलमध्ये शतक झालेलं पाहायचंय, झालाय मोठा फॅन!

IPL 2021: ब्रायन लाराला भारताच्या 'या' युवा क्रिकेटपटूचं आयपीएलमध्ये शतक झालेलं पाहायचंय, झालाय मोठा फॅन!

IPL 2021, Brian Lara: आयपीएल स्पर्धेत दरवर्षी भारतीय क्रिकेटला नवे रत्न सापडत असतात. प्रतिभा असूनही व्यासपीठ मिळू शकत नसलेल्या गुणवान युवा खेळाडूंना आयपीएलच्या माध्यमातून जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याची आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते. गेल्या वर्षीचं आयपीएल कोरोनामुळे यूएईमध्ये खेळविण्यात आली. आयपीएलच्या गेल्या मोसमातून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणारा सलामीवीर देवदत्त पडिक्कल हे नवं रत्न भारतीय क्रिकेटला सापडलं. भारताच्या या युवा डावखुऱ्या फलंदाजानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. 

धोनी अन् शाहरुख खानमध्ये बराच वेळ चर्चा, सर्वच थक्क; नेमकं काय घडलं? पाहा...

वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा देखील पडिक्कलचे चाहते झाले आहेत. पडिक्कलनं आयपीएलच्या गेल्या मोसमात आरसीबीसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. पण यंदाचा पहिला सामना पडिक्कलला कोरोनाची लागण झालेली असल्यामुळे खेळता आला नाही. तर दुसऱ्या सामन्यात तो ११ धावांवर बाद झाला. ब्रायन लारा यांनी पडिक्कलला फलंदाजीत काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली आहे. पण तो एक प्रतिभावान खेळाडू असून यंदाच्या सीझनमध्ये त्याच्याकडून काही अपेक्षा देखील लारा यांनी व्यक्त केल्या आहेत. 

IPL 2021: महेंद्रसिंग धोनीला एका २८ वर्षीय खेळाडूनं मोठ्या संकटातून वाचवलं, नाहीतर...

गेल्या पाच महिन्यांमध्ये पडिक्कलनं आपल्या फलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे आणि त्याच्या फलंदाजीत नक्कीच सुधारणा झालेली पाहायला मिळेल अशी सर्वांची अपेक्षा आहे. "पडिक्कल एक प्रतिभावान खेळाडू आहे. गेल्या मोसमात त्यानं पाच अर्धशतकं ठोकली होती. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मला त्याचं शतक झालेलं आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार प्राप्त झालेलं पाहायचं आहे. त्याला काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. पण नक्कीच आशा आहे की त्यानं त्यावर गेल्या पाच महिन्यांमध्ये मेहनत घेतली असेल आणि यंदा तो शानदार कामगिरी करेल", असं ब्रायन लारा यांनी म्हटलं आहे. 'स्टार स्पोर्ट्स' वाहिनीवरील 'क्रिकेट डगआऊट' कार्यक्रमात ते बोलत होते. 

IPL मधून निवृत्ती घेतलेल्यांची Playing XI पाहिलीत का?, गंभीर कॅप्टन, तर सचिन सलामीवीर!

आयपीएलमध्ये पडिक्कलची दमदार कामगिरी
आयपीएलमध्ये २०२० साली देवदत्त पडिक्कलनं पदार्पण केलं आणि आपल्या पहिल्याच सीझनमध्ये त्यानं आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला. पडिक्कलनं गेल्या सीझनमध्ये १५ सामने खेळले आणि यात एकूण ४७३ धावा केल्या. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. ७४ धावा ही त्याची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली होती. पडिक्कलनं आपल्या पहिल्या चार पैकी तीन सामन्यांमध्ये अर्धशतकं ठोकली होती. 
देवदत्तनं नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडकातही दमदार कामगिरी केली आहे. स्पर्धेतील सात सामन्यांमध्ये त्यानं तब्बल ७३७ धावा केल्या आहेत. यात चार शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: brian lara want to see devdutt padikkal to score a hundred in ipl 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.