Ravi Ashwin : रिषभ पंतनंतर आर अश्विनकडूनही इंग्लंडचा कर्णधार जो रूट चीतपट; ICCनंही केला गौरव

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१पासून जाहीर केलेल्या महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कारांमध्ये जानेवारी व फेब्रुवारीत भारतीय खेळाडूंनी बाजी  मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 01:49 PM2021-03-09T13:49:24+5:302021-03-09T14:15:52+5:30

whatsapp join usJoin us
Breaking : Ravi Ashwin won the Men's ICC Player of the month award for February | Ravi Ashwin : रिषभ पंतनंतर आर अश्विनकडूनही इंग्लंडचा कर्णधार जो रूट चीतपट; ICCनंही केला गौरव

Ravi Ashwin : रिषभ पंतनंतर आर अश्विनकडूनही इंग्लंडचा कर्णधार जो रूट चीतपट; ICCनंही केला गौरव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१पासून जाहीर केलेल्या महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कारांमध्ये जानेवारी व फेब्रुवारीत भारतीय खेळाडूंनी बाजी  मारली. जानेवारी महिन्यातील Men’s Player of the Month पुरस्कार टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) यानं पटकावला होता. आता भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन ( R Ashwin) यानं फेब्रुवारी महिन्याचा पुरस्कार पटकावला. त्यानं इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) आणि वेस्ट इंडिजचा ( Kyle Mayers) यांना चीतपट केलं. ( The ICC Men’s Player of the Month of February winner )

आयसीसीनं नव्यानं जाहीर केलेल्या ICC Men’s Player of the Month पुरस्काराचा पहिला मानकरी भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ठरला. या पुरस्कारासाठी रिषभसमोर इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) आणि आयर्लंडचा पॉल स्टीर्लिंग यांचे आव्हान होते. जो रूटनं या महिन्यात दोन कसोटींत १०६.५०च्या सरासरीनं ४२६ धावा केल्या. आयर्लंडच्या स्टीर्लिंगनं वन डे सामन्यात १०५च्या सरासरीनं ४२० धावा चोपल्या, तर रिषभनं ८१.६६च्या सरासरीनं २४५ धावा केल्या. WTC Final : टीम इंडियाला जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये पोहोचवणारे ६ खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्याला मुकणार?

फेब्रुवारी महिन्यातील खेळाडूंची कामगिरी  
जो रूट - २१८ धावा, ५५.५ सरासरी आणि ६ विकेट्स
आर अश्विन - १०६ धावा, ३५.२ सरासरी आणि २४ विकेट्स, १५.७ सरासरी
कायले मेयर्स - २६१ धावा, ८७ सरासरी  

Web Title: Breaking : Ravi Ashwin won the Men's ICC Player of the month award for February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.