Breaking : राहुल द्रविडबाबत BCCIचा मोठा निर्णय, हितसंबंध जपण्याचे प्रकरण 

बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीच्या अधिकाऱ्यांनी द्रविडला नोटीस बजावली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 08:35 PM2019-11-14T20:35:57+5:302019-11-14T20:36:14+5:30

whatsapp join usJoin us
Breaking : Rahul Dravid cleared of conflict of interest charges by BCCI ethics officer | Breaking : राहुल द्रविडबाबत BCCIचा मोठा निर्णय, हितसंबंध जपण्याचे प्रकरण 

Breaking : राहुल द्रविडबाबत BCCIचा मोठा निर्णय, हितसंबंध जपण्याचे प्रकरण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीच्या अधिकाऱ्यांनी द्रविडला नोटीस बजावली होती. या नोटीशीमध्ये द्रविड परस्पर हितसंबंध जपत असल्याचे म्हटले गेले होते. या नोटीशीवर द्रविडला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानुसार द्रविडने आपली बाजू मांडली होती. द्रविड हा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. पण दुसरीकडे द्रविड चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक असलेल्या एन. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट्स या कंपनीमध्ये उपाध्यक्ष आहे. त्यामुळे द्रविड परस्पर हितसंबंध जपत आहे, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्यावर आज बीसीसीआयच्या नीतीमुल्य अधिकाऱ्यांनी निर्णय दिला.

भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष राहुल द्रविडला बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी एक नोटीस पाठवल होती. द्रविड हा परस्पर हितसंबंधांमध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे तो भारताच्या खेळाडूंना मार्गदर्शन करू शकत नाही, असा या नोटीशीचा मतितार्थ होता. एक खेळाडू म्हणून द्रविड हा जंटलमन होता. प्रशिक्षक म्हणूनही द्रविडने आपली छाप पाडली आहे. पण आता द्रविड परस्पर हितसंबंधांमध्ये गुंतल्याचे बीसीसीआयला वाटत आहे. कारण एक संघटक आणि उद्योगपती यांच्याबरोबर द्रविडचे संबंध बीसीसीआयनेच उघड केले आहेत.

द्रविड हा निवृत्तीनंतर आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स या संघाबरोबर काम करत होता. राजस्थानच्या संघाचा तो प्रशिक्षक होता. चेन्नई सुपर किंग्सचा संघ त्यांचा प्रतिस्पर्धी होती. पण तरीही या प्रतिस्पर्धी संघाच्या मालकाबरोबर द्रविडचे घनिष्ठ संबंध होते. कारण चेन्नईच्या संघाचे मालक एन. श्रीनिवासन आहेत. एन. श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स या कंपनीचे मालक आहे. आपल्या कंपनीमध्ये एन. श्रीनिवासन यांनी द्रविडला उपाध्यक्ष हे महत्वाचे पद दिले आहे. त्यामुळे बीसीसीआयने द्रविडला परस्पर हितसंबंध जपल्याची नोटीस पाठवली आहे.
त्याचबरोबर तो सध्याच्या घडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. त्याचबरोबर युवा खेळाडूंनाही तो मार्गदर्शन करत असतो. यावेळी जर चेन्नईच्या संघातील खेळाडू यामध्ये असेल तर द्रविड त्याला झुकते माप देऊ शकतो, असे बीसीसीआयला वाटते आणि हेच परस्पर हितसंबंध जपले जाऊ शकतील. त्यामुळे बीसीसीआयने द्रविडला नोटीस पाठवून याबाबत आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.

पण, नीतीमुल्य अधिकाऱ्यांनी द्रविडची बाजू एकून घेतल्यानंतर त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. बीसीसीआयचे लोकपाल आणि नीतीमुल्य अधिकारी निवृत्त न्यायाधिश डी के जैन यांनी सांगितले की,'' द्रविडच्या प्रकरणात मला हितसंबंध जपल्याचं काहीच जाणवतं नाही.   


 

Web Title: Breaking : Rahul Dravid cleared of conflict of interest charges by BCCI ethics officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.