आयपीएलच्या १४व्या पर्वाला दुखापतीचे ग्रहण लागण्यास सुरूवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर हा दुखापतीमुळे आयपीएलच्या सामन्याला मुकलेला असताना आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचे दुःख विसरतोय तोच त्यांच्यासाठी वाईट बातमी आली. संघातील अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) यानं आयपीएलमधून माघार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलची कॅच घेताना त्याला ही दुखापत झाली आणि त्याचं बोट तुटल्याची माहिती RR ने दिली. तो आयपीएलच्या फायनलपर्यंत संघासोबतच राहणार आहे.
संजू सॅमसनच्या शतकानंतरही राजस्थान रॉयल्स पराभूतइंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील आतापर्यंतचा सर्वात थरारक सामना म्हणून राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Rajasthan Royals vs Punjab Kings) याची नोंद होईल. लोकेश राहुल ( KL Rahul), दीपक हुडा ( Deepak Hooda) आणि ख्रिस गेल ( Chris Gayle ) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्सनं ( PBKS) २२१ धावांचा डोंगर उभा केला. पण, राजस्थान रॉयल्सचा ( RR) नवा कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) एकटा भिडला आणि ११९ धावांची खेळी करून कडवी टक्कर दिली. पंजाबनं हा सामना अवघ्या ४ धावांनी जिंकला. लोकेश राहुलनं ५० चेंडूंत ९१ धावा, दीपक हुडानं २८ चेंडूंत ६४ धावा आणि गेलनं ४० धावा केल्या. पंजाबनं ६ बाद २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात RRच्या संजू सॅमसननं ६३ चेंडूंत १२ चौकार व ७ षटकार खेचून ११९ धावांची खेळी केली, परंतु RRला ७ बाद २१७ धावांपर्यंत मजल मारता आली. सॅमसन वगळता RRच्या एकाही फलंदाजाला ३० धावांचा पल्ला ओलांडता आला नाही.