रवी शास्त्रींनी भारतीय संघाला दिल्या अशा शुभेच्छा; म्हणाले...

शास्त्री हे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काही सेलिब्रेटी व्यक्तींबरोबर गेले आहेत. पण नवीन वर्षाचा पूर्वसंध्येला त्यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 08:55 PM2019-12-31T20:55:25+5:302019-12-31T20:55:50+5:30

whatsapp join usJoin us
The best wishes Ravi Shastri gives to the Indian team for 2020; Said ... | रवी शास्त्रींनी भारतीय संघाला दिल्या अशा शुभेच्छा; म्हणाले...

रवी शास्त्रींनी भारतीय संघाला दिल्या अशा शुभेच्छा; म्हणाले...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देशास्त्री यांनी संघाला शुभेच्छा देताना म्हटले आहे की...

मुंबई : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. शास्त्री हे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काही सेलिब्रेटी व्यक्तींबरोबर गेले आहेत. पण नवीन वर्षाचा पूर्वसंध्येला त्यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. प्रशिक्षकांच्या निवडीसाठी माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने मुख्य प्रशिक्षकपदाची माळ पुन्हा एकदा शास्त्री यांच्यात गळ्यात घातली.

शास्त्री यांनी संघाला शुभेच्छा देताना म्हटले आहे की, " नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्यावर्षी तुम्ही दमदार कामगिरी केली आणि आता पुढील वर्षी येणाऱ्या आव्हानांसाठी सज्ज राहा. आयुष्य एन्जॉय करा. आता २०२०मध्येच आपण भेटू." 

रवी शास्त्रींबरोबर थर्टी फर्स्ट साजरा करणारी 'ती' सुंदरी आहे तरी कोण...
भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे कायम चर्चेत असतात. आता तर ते एका फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या फोटोमध्ये रवी शास्त्री यांच्याबरोबर एक सुंदर तरुणी पाहायला मिळत आहे. पण ही तरूणी आहे तरी कोण, असा सवाल आता चाहते विचारू लागले आहेत.

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काही सेलिब्रेटी यावेळी एकत्र अलिबागला जमल्याची चर्चा आहे. यामध्ये शास्त्री, सिंघानिया, शाहरुख यांचा समावेश आहे. शास्त्री यांच्याबरोबर या फोटोमध्ये असलेली सुंदरी एक अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे 'तू चीझ बडी हैं मस्त, मस्त' फेम रवीना टंडन.

Web Title: The best wishes Ravi Shastri gives to the Indian team for 2020; Said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.