मुंबई : सध्याच्या घडीला भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर हा चर्चेत आहे. कारण बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात दीपकने हॅटट्रिकसह तब्बल सहा बळी मिळवण्याची किमया साधली होती. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० सामन्यांमधील सर्वोत्तम कामगिरीही त्याने आपल्या नावावर केली होती. पण या दीपकच्या पराक्रमानंतर एका सुंदर तरुणीचा फोटो चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे.

या तरुणीने एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याचा आहे. या व्हिडीओमध्ये भारताचे सर्व खेळाडू चहरचे अभिनंदन करताना दिसत आहे. या तरुणीने या व्हिडीओखाली, 'मला तुझा अभिमान वाटतो. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये हॅटट्रिक मिळवण्याबरोबरच तू सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहेस.'

 

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात दीपकने सात धावांमध्ये सहा बळी मिळवण्याचा पराक्रम केला होता. यावेळी त्याने श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसला मागे टाकले. मेंडिसने आठ धावांमध्ये सहा बळी मिळवले होते. त्यामुळे आता ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज चहर ठरला आहे.

चहरच्या या पराक्रमानंतर या तरुणीने एक व्हिडीओ शेअर केला. त्यावर कॅप्शनही दिली. त्यानंतर या मुलीचा फोटो चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे. चहरबरोबरचे तिचे काही फोटोही सोशल मीडियावर फिरत आहे. ही मुलगी दुसरी कोणी नसून दीपकची बहीण मालती चहर आहे.

Web Title: This beautiful lady's photo was viral after Deepak Chahar's hat trick, know why ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.