IPL 2021: मोठा खुलासा! IPLच्या गव्हर्निंग काऊन्सिलनं दिलेल्या सल्ल्याकडे 'BCCI'नं केला होता कानाडोळा!

IPL 2021: आयपीएलला आता कोरोनाचं ग्रहण लागलं असताना आता स्पर्धेच्या आयोजनाबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 01:45 PM2021-05-04T13:45:50+5:302021-05-04T13:46:21+5:30

whatsapp join usJoin us
BCCI turned a deaf ear to governing councils proposal of hosting IPL 2021 in the UAE | IPL 2021: मोठा खुलासा! IPLच्या गव्हर्निंग काऊन्सिलनं दिलेल्या सल्ल्याकडे 'BCCI'नं केला होता कानाडोळा!

IPL 2021: मोठा खुलासा! IPLच्या गव्हर्निंग काऊन्सिलनं दिलेल्या सल्ल्याकडे 'BCCI'नं केला होता कानाडोळा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: आयपीएलला आता कोरोनाचं ग्रहण लागलं असताना आता स्पर्धेच्या आयोजनाबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. कोरोनाचा धोका असल्यानं यंदाच्या आयपीएल स्पर्धेचं आयोजन देखील संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) करावं असा सल्ला आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिला होता. स्पर्धेला सुरुवात होण्याच्या आठवड्याभरापूर्वीच देशातील कोरोनाची परिस्थिती पाहून याबाबतचा सल्ला देण्यात आला होता. पण बीसीसीआयनं त्याकडे कानाडोळा केल्याची माहिती समोर आली आहे. ( BCCI turned a deaf ear to governing councils proposal of hosting IPL 2021 in the UAE)

यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द; कोरोना प्रकोपामुळे BCCI चा मोठा निर्णय

भारतात इंग्लंड विरुद्धची मालिका यशस्वीपणे पार पडल्यानं बीसीसीआयनं आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिल दिलेल्या सल्ल्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेप्रमाणेच आयपीएल देखील यशस्वीरित्या भारतातच पार पाडली जाईल अशी भूमिका तेव्हा बीसीसीआयनं घेतली होती. आयपीएल सुरु होण्याआधी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यात टी-२०, वनडे आणि कसोटी मालिकेचं आयोजन करण्यात आलं होतं. 

IPL 2021: परदेशी खेळाडूंमध्ये कोरोनाची दहशत, IPL सोडण्याचा विचार; फ्रँचायझीनं केला खुलासा

दरम्यान, गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धेचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. शारजा, दुबई आणि अबू धाबी अशा तीन ठिकाणी १९ सप्टेंबर २०२० ते १० नोव्हेंबर २०२० या कालावधीत आयपीएलचं गेलं सीझन यशस्वीरित्या पार पडलं होतं. 

आयपीएलला मोठा धक्का! दिल्ली, हैदराबाद संघातही कोरोनाचा शिरकाव; अमित मिश्रा, वृद्धीमान सहाला लागण

"यूएईमध्येच यंदाच्या आयपीएलचं आयोजन केलं जावं हाच पहिला पर्याय आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलसमोर होता. पण त्यावेळी बीसीसीआयनं यात रस दाखवला नाही. प्रत्येकजण त्यावेळी एकमेकांच्या भूमिकेची वाट पाहात राहिला आणि यूएईमधील आयोजनाचा प्रस्ताव बारगळला", अशी माहिती आयपीएलमधील एका अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिली आहे.

आयपीएलमधील आता आणखी दोन संघांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं यंदाची स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयनं जाहीर केला आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्जनंतर सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनानं धडक दिली आहे. हैदराबादचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण संघ आता क्वारंटाइन झाला आहे. 
 

Read in English

Web Title: BCCI turned a deaf ear to governing councils proposal of hosting IPL 2021 in the UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.