Covid 19 hits IPL 2021 SRH wicketkeeper Wriddhiman Saha DC spinner Amit Mishra test positive | BREAKING: आयपीएलला मोठा धक्का! दिल्ली, हैदराबाद संघातही कोरोनाचा शिरकाव; अमित मिश्रा, वृद्धीमान सहाला लागण

BREAKING: आयपीएलला मोठा धक्का! दिल्ली, हैदराबाद संघातही कोरोनाचा शिरकाव; अमित मिश्रा, वृद्धीमान सहाला लागण

IPL 2021:  आयपीएलला आणखी मोठा धक्का बसला आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातही कोरोना धडकला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान सहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Covid-19 hits IPL 2021: SRH wicketkeeper Wriddhiman Saha, DC spinner Amit Mishra test positive)

दिल्ली आणि हैदराबाद संघातील दोघंही प्रमुख खेळाडू आहेत. त्यामुळे संपूर्ण संघ आता क्वारंटाइन होण्याची शक्यता आहे. पर्यायानं दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांच्या सामन्यांवरही गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिश्रा आणि वृद्धीमान साहा यांची पहिली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दोघांचीही पुन्हा एकदा चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल येण्याची प्रतिक्षा आहे. 

दरम्यान, आयपीएलमधील आता चार संघांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं बीसीसीआयनंही तातडीनं पाऊल उचलत यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Covid 19 hits IPL 2021 SRH wicketkeeper Wriddhiman Saha DC spinner Amit Mishra test positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.