IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी BCCI करणार चार्टर्ड फ्लाईटची सोय; द. आफ्रिकेच्या खेळाडूंना मिळालं ग्रीन सिग्नल!

आयपीएलचे १४ वे पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ लागली आहे. पण, काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमानसेवा रद्द केल्यानं मायदेशात जायचे कसे, हा प्रश्न अनेकांना सतावत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 02:39 PM2021-05-05T14:39:55+5:302021-05-05T14:40:24+5:30

whatsapp join usJoin us
BCCI looking to arrange charter flights for Australia contingent, South African players and coaches get the green light  | IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी BCCI करणार चार्टर्ड फ्लाईटची सोय; द. आफ्रिकेच्या खेळाडूंना मिळालं ग्रीन सिग्नल!

IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी BCCI करणार चार्टर्ड फ्लाईटची सोय; द. आफ्रिकेच्या खेळाडूंना मिळालं ग्रीन सिग्नल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलचे १४ वे पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ लागली आहे. पण, काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमानसेवा रद्द केल्यानं मायदेशात जायचे कसे, हा प्रश्न अनेकांना सतावत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं १५ मेपर्यंत भारतातील विमानसेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकले आहेत. देशातील कोरोना परिस्थिती पाहता त्यांना लवकरात लवकर मायदेशात पोहचायचे आहे आणि त्यासाठी बीसीसीआय व क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्याकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडू व सपोर्ट स्टाफ सदस्यांना घरी सुखरुप आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी मुख्य अधिकारी निक हॉकली यांनी दिली. KKRचा वरुण चक्रवर्थी हॉस्पिटलमध्ये गेला अन् DCच्या अमित मिश्रा कोरोना संकटात सापडला; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशात जाण्यापूर्वी मालदिवचा आसरा घेतील अशी चर्चा होती, परंतु आता त्या श्रीलंकेचा पर्यायही समोर आला आहे. हॉकली यांनी  हे दोन पर्याय समोर ठेवले आहेत. ते म्हणाले, सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अम्पायर्स, समालोचक यांना सुखरूप घरी आणण्यासाठी आम्ही सर्व तयारी करत आहोत. बीसीसीआय आणि आम्ही सोबत मिळून काम करत आहोत. बीसीसीआयकडून आम्हाला चांगलं सहकार्य मिळत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत बीसीसीआयकडून आम्हाला पुढील डिटेल्स मिळतील. मालदीव किंवा श्रीलंका येथून ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी बीसीसीआय चार्टर्ड फ्लाईट्सचीही सोय करणार आहेत. बीसीसीआय त्यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अहमदाबादमध्ये खेळाडूंची बस जाण्यासाठी अडवली रुग्णवाहिका; Video व्हायरल 

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची घरवापसी
आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची घरवापसी होणार असून त्यांना सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं कागिसो रबाडा व अॅनरिच नॉर्ट्झे यांच्यात भीतीचे वातावरण आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात फॅफ ड्यू प्लेसिस, इम्रान ताहीर व लुंगी एनगीडी यांनाही कोरोनाची भीती आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका सरकारनं खेळाडूंना मायदेशात परतण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागेल. आयपीएलमध्ये जवळपास १४ खेळाडू व प्रशिक्षक सहाभागी झाले होते. 

Web Title: BCCI looking to arrange charter flights for Australia contingent, South African players and coaches get the green light 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.