बीसीसीआयला विसर; महिला काँग्रेसने आणले भानावर

बीसीसीआयची ही चूक झाल्यावर त्यांना महिला काँग्रेसने भानावर आणल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 11:02 AM2019-11-12T11:02:13+5:302019-11-12T11:04:34+5:30

whatsapp join usJoin us
BCCI forgets cricket records; all India mahila Congress correct them | बीसीसीआयला विसर; महिला काँग्रेसने आणले भानावर

बीसीसीआयला विसर; महिला काँग्रेसने आणले भानावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : एखाद्या क्रीडा संघटनेला आपल्या खेळाबद्दल सर्व माहिती असणे गरजेचे असते. पण जगातील सर्वात मोठी समजली जाणारी संघटना असलेल्या बीसीसीआयलाच आपल्या खेळातील विक्रमांचा विसर झाल्याचे पाहायला मिळाले. पण बीसीसीआयची ही चूक झाल्यावर त्यांना महिला काँग्रेसने भानावर आणल्याचे पाहायला मिळाले आहे.

बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत वेगवान दीपक चहारने आपली छाप पाडली. नेत्रदीपक गोलंदाजी करत चहरने सर्वांची मने जिंकली. धावांचा पाठलाग करताना दीपक चहरने तिसऱ्या षटकात बांगलादेशला दोन धक्के दिले. त्यानं लिटन दासला पहिले बाद केले. वॉशिंग्टन सुंदरनं सुरेख झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर त्यानं सौम्या सरकारला माघारी पाठवलं. त्यामुळे आता त्याचे संघातील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांचे संघातील स्थान पक्के झाल्याचे समजते. पण काही खेळाडूंचे स्थान मात्र आता धोक्यात आले असल्याचेही म्हटले जात आहे.

बीसीसीआयने एक ट्विट करत दीपकने भारताकडून ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पहिली हॅट्ट्रिक घेतली, असे लिहिले होते. बीसीसीआयचे सचिन जय शहा यांनीदेखील याच प्रकारचे ट्विट करत दीपकचे अभिनंदन केले होते. पण महिला काँग्रेसने या दोघांचीही चूक झाल्याचे दाखवून दिले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून एकता बिश्तने पहिली हॅट्ट्रिक घेतल्याचे दाखवून दिले.

रिषभ पंतला पुन्हा संधी मिळणार का, वाचा काय म्हणाले सुनील गावस्कर

मुंबई : भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्धच्या सामन्या अपयशी ठरला. त्यामुळे आता पंतला किती संधी द्यायच्या, असा प्रश्न आता चाहते विचारायला लागले आहेत. पण आता या गोष्टीमध्ये उडी घेतली आहे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी.

पंतला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात आपली छाप पाडता आली नाही. फलंदाजी करताना पंतला ९ चेंडूंत ६ धावा करता आल्या. यष्टीरक्षणामध्येही त्याला फारसी चमक दाखवता आली नाही. पंतने रोहितला एक DRS घेण्यासाठी भाग पाडले. त्यावेळी पंत हा आत्मविश्वासाने रोहितला सांगत होता. पण यावेळीही पंतचा निर्णय चुकल्याचेच पाहायला मिळाले. त्यावेळी रोहितने डोक्यावर हात मारल्याचेही पाहायला मिळाले.

याबाबत सुनील गावस्कर यांनी सांगितले की, " जर एखादा व्यक्ती दहावेळा चांगले काम करतो आणि एकदा त्याच्याकडून जर चूक होते तेव्हा त्याची चर्चा होते. पंतबरोबरही असेच काहीसे सुरु आहे. पंत यष्टीरक्षण करताना ९५ टक्के गोष्टी योग्य करतो, पण एका गोष्टीमध्ये त्याच्याकडून चूक होते आणि त्याचीच जास्त चर्चा होते."

Web Title: BCCI forgets cricket records; all India mahila Congress correct them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.