batsman with More than 3000 runs in IPL despite low strike rate | IPL: कमी स्ट्राईक रेट तरीही आयपीएलमध्ये ३ हजारापेक्षा जास्त धावा

IPL: कमी स्ट्राईक रेट तरीही आयपीएलमध्ये ३ हजारापेक्षा जास्त धावा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच असे खेळाडू आहेत. ज्यांनी ३ हजारापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र त्यांचा स्ट्राईक रेट हा खुपच कमी आहे. त्यात सध्या दिल्लीकडे असलेल्या अजिंक्य रहाणे, शिखर धवन यांचा समावेश आहे.

रहाणे याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १५० सामन्यात ३९३३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा १२१.३८ एवढाच राहिला आहे. तीन हजार पेक्षा जास्त धावा करुनही त्याचा स्ट्राईक रेट सर्वात कमी आहे. त्याने राजस्थान रॉयल्स, रायजीग सुपरजायंट्स पुणे यांच्याकडून खेळ केला आहे. आता तो
दिल्लीच्या ताफ्यात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन याने देखील १७७ सामन्यात ५२८२ धावा केल्या आहेत. तो सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने आयपीएलमध्ये ६०१ चौकार लगावले आहेत. तरीही देखील त्याच स्ट्राईक रेट हा १२७.२७ ए‌वढाच आहे. तर त्यासोबतच मनिष पांडे १२१.५८, रायुडू १२६.१८ आणि केकेआरला दोन वेळा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार गंभीर १२३.८८ यांचाही स्ट्राईक रेट इतर फलंदाजांच्या तुलनेने कमी आहे. तरी देखील हे यशस्वी फलंदाज आहे. यातील गंभीर निवृत्त झाला आहे. तर अजिंक्य रहाणेला गेल्या सत्रात फारशी संधी मिळाली नाही. या सत्रात देखील दिल्लीच्या फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजीत त्याची पारंपरीक फटके मारण्याची शैली वेगळी आहे.

३००० पेक्षा जास्त धावा पण स्ट्राईक रेट कमी असलेले फलंदाज

अजिंक्य रहाणे (दिल्ली) १२१.३८

मनिष पांडे(हैदराबाद) १२१.५९

गौतम गंभीर १२३.८८

अंबाती रायुडू(चेन्नई) १२६.१८

शिखर धवन १२७.२७

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: batsman with More than 3000 runs in IPL despite low strike rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.