हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय

Australia Vs England Ashes 2025: गोलंदाजीला अनुकूल असलेल्या पर्थच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने टी-२० स्टाईलमध्ये ठोकलेल्या शतकाच्या जोरावर २०५ धावांच्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने आठ गडी राखून सहज फडशा पाडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:15 IST2025-11-22T16:14:32+5:302025-11-22T16:15:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Australia Vs England Ashes 2025: Travis Head's T20 style century, Australia's sensational victory in the first Ashes Test | हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय

हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू झालेल्या ॲशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन दिवसांत सनसनाटी विजय मिळवला आहे. गोलंदाजीला अनुकूल असलेल्या पर्थच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने टी-२० स्टाईलमध्ये ठोकलेल्या शतकाच्या जोरावर २०५ धावांच्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने आठ गडी राखून सहज फडशा पाडला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे.

काल सुरू झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडचा डाव अवघ्या १७२ धावांत गुंडाळून जोरदार सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडचा कप्तान बेन स्टोक्स याने कांगारूंवर जोरदार प्रतिहल्ला करत ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १३२ धावांत गुंडाळला. त्याबरोबरच फलंदाजीसाठी अत्यंत कठीण असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडला ४० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.

मात्र या आघाडीचा इंग्लंडच्या संघाला फायदा घेता आला नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पुन्हा एकदा टिच्चून मारा करत इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १६४ धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे ही लढत रंगतदार स्थितीत पोहोचली. इंग्लंडचे गोलंदाज पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवणार का? याबाबतत तर्कवितर्क लढवले जात होते. त्याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून सलामीला उतरलेल्या  ट्रॅव्हिड हेड याने सामन्याचे चित्रच पालटून टाकले.

हेड याने सुरुवातीपासूनच चौकार, षटकारांची बरसात करून इंग्लंडच्या गोलंदाजीवर दबाव आणला. त्याने अवघ्या ६९ चेंडूत शतक पूर्ण केले. यादरम्यान, हेडने जॅक वेथरल्डसोबत ७५ आणि मार्नस लाबुशेनसोबत ११७ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला . अवघ्या ८३ चेंडूत १६ चौकार आणि ४ षटकारांसह १२३ धावा कुटून हेड बाद झाला. मात्र तत्पूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला होता. अखेरीस मार्शल लाबुशेन (नाबाद ५१) आणि स्टिव्हन स्मिथ (नाबाद २) यांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
 

Web Title : हेड के टी20 शतक से एशेज टेस्ट में ऑस्ट्रेलिया की शानदार जीत

Web Summary : ऑस्ट्रेलिया का दबदबा! हेड के तूफानी शतक ने उन्हें एशेज श्रृंखला के शुरुआती टेस्ट में इंग्लैंड के खिलाफ सिर्फ दो दिनों में जीत दिलाई। शुरुआती झटकों के बावजूद, हेड की आक्रामक बल्लेबाजी ने आठ विकेट से जीत सुनिश्चित की, जिससे ऑस्ट्रेलिया को 1-0 की बढ़त मिली। लाबुशेन की स्थिर पारी ने जीत को और मजबूत किया।

Web Title : Head's T20 Century Leads Australia to Ashes Test Victory

Web Summary : Australia Dominates! Head's explosive century propelled them to an Ashes series-opening victory against England in just two days. Despite a shaky start, Head's aggressive batting secured an eight-wicket win, giving Australia a 1-0 series lead. Labuschagne's steady innings further solidified the win.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.