ठळक मुद्देटीम इंडियानं ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना मालिका २-१ अशी जिंकलीअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखण्यात यश मिळवलं
एकेक संकटावर मात करताना भारतीय संघानं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. 0-1 अशा पिछाडीवरून भारतीय संघानं जबरदस्त कमबॅक करताना कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन ( Tim Paine) याच्यावर जोरदार टीका झाली. आता तर तो या पराभवामागे अजब कारण असल्याचा दावा करत आहे. भारतीय खेळाडूंनी आभासी चित्र निर्माण करून आमचं लक्ष विचलित केलं, असा दावा पेनकडून करण्यात येत आहे. भारतीय संघ सुरुवातीला ब्रिस्बनला येण्यास चाचपडत होता आणि आम्हालाही मालिकेचा अंतिम सामना कुठे होईल, याची कल्पना नव्हती. त्यांनी याचाच फायदा घेतला अन् आमचं लक्ष विचलित केलं. सलग पाचव्या वर्षी विराट कोहली अँड टीमनं केला पराक्रम; पण, न्यूझीलंडकडून धोका
''भारताविरुद्ध खेळताना आणखी एक आव्हान समोर असतं आणि ते म्हणजे ते क्षुल्लक बाबींबद्दल तक्रार करतात. ज्या गोष्टीला महत्त्व नाही त्यावरून ते लक्ष विचतिल करण्याचा प्रयत्न करतात. त्या मालिकेत आम्ही त्यांच्या या प्रयत्नांना बळी पडलो,''असे पेन म्हणाला. ''याचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी गॅब्बात येणार नाही अशी हवा केली. त्यामुळे आम्हालाही हे कळत नव्हतं की नक्की आपण कुठे जाणार आहोत. ते आभासी चित्र तयार करण्यात हुशार आहेत,''असेही तो म्हणाला. MS Dhoniच्या संघातील खेळाडू बनणार टीम इंडियाचा नवा ऑलराऊंडर, घेणार हार्दिक पांड्याची जागा!
या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या अॅडलेड कसोटीत भारतीय संघ 36 धावांत तंबूत परतला होता. कसोटी क्रिकेटमधील ही भारताची निचांक खेळी ठरली. त्यानंतर विराट पितृत्व रजेसाठी मायदेशात परतला. त्यानंतर अजिंक्यनं मेलबर्न कसोटीत शतकी खेळी करताना संघाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. सिडनी कसोटीत आर अश्विन, हनुमा विहारी यांनी जवळपास 45 षटकं खेळून काढताना सामना अनिर्णीत राखला. ब्रिस्बेन कसोटीत रिषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं 3 विकेट्स राखून विजय मिळवला अन् मालिका 2-1 अशी खिशात घातली. IPLमध्ये खेळण्यासाठी स्टार गोलंदाज सोडणार पाकिस्तानचं नागरिकत्व?; लंडनमध्ये होणार स्थायिक!
पेन होतोय ट्रोल