Asia Cup 2025, BAN vs SL Head to Head Record : यूएईच्या मैदानात सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील पाचव्या लढतीत 'ब' गटातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत. गत विजेता श्रीलंकन संघ बांगलादेश विरुद्धच्या लढतीसह यंदाच्या हंगामातील मोहिमेला सुरुवात करणार आहे. बांगलादेशच्या संघाने हाँगकाँगविरुद्धचा सामना जिंकला असून दुसऱ्या विजयासह ते आपल्या गटातून सुपर फोरची दावेदारी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असतील. इथं जाणून घेऊयात Live Streaming सह हा सामना कुठं अन् कसा पाहता येईल? कसा आहे दोन्ही संघातील आंतरराष्ट्रीय टी-२० मधील रेकॉर्ड यासंदर्भ सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन्ही संघात काँटे की टक्कर
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये स्लेजिंग अन् आक्रमकता याचाही खेळ पाहायला मिळतो. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध अगदी खुन्नस देऊन खेळतात. श्रीलंकाचे वर्चस्वाला धक्का देत बांगलादेशच्या संघानं काही अविस्मरणीय विजय नोंदवले आहेत. यापलिकडे 'नागिन डान्स'नंतर दोन्ही संघातील स्पर्धा अधिक तीव्र झालीये.
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
नागिन डान्स कोण करणार?
२०१८ च्या निदहास ट्रॉफी स्पर्धेपासून श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील चुरस आणखी वाढलीये. भारतीय संघासह या दोन संघाचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या. सेमी फायनलमध्ये श्रीलंकेच्या संघाला पराभूत केल्यावर दोन्ही संघातील खेळाडूंमधील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामागचं कारण होतं ते बांगलादेशच्या संघातील खेळाडूंनी केलेले नागिन डान्स सेलिब्रेशन. घरच्या मैदानावरील या पराभवाचा बदला श्रीलंकेच्या संघाने २०२२ मध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत घेतला होता. दुबईच्या मैदानात 'करो वा मरो' लढतीत बांगलादेशच्या संघाला शह दिल्यावर श्रीलंकेच्या संघानेही नागिन डान्स केल्याचे पाहायला मिळाले होते. 'टायगर वर्सेस शेर' यांच्यातील लढतीत यावेळी नागिन डान्स कोण करणार ते पाहण्याजोगे असेल.
कसा आहे BAN vs SL या दोन संघातील Head to Head Record?
आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत हे दोन संघ १७ वेळा समोरासमोर आले आहेत. यात १४ वेळा श्रीलंकेच्या संघाने बाजी मारलीये. तर बांगलादेशचा संघ फक्त ३ वेळा जिंकलाय. आंतरारष्ट्रीय टी-२० मध्येही श्रीलंकेच पारडे जड आहे. २० पैकी १२ वेळा श्रीलंकेचा संघ जिंकलाय. बांगलादेशच्या संघाने फक्त ८ सामने जिंकले असले तरी श्रीलंकेचा संघ त्यांना हलक्यात घेणार नाही.
Live Streaming सह हा सामना कुठं अन् कसा पाहता येईल?
BAN vs SL यांच्यातील सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार, रात्री ८ वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून या लढतीचं थेट प्रेक्षपण करण्यात येईल. ऑनलाइन Live स्ट्रीमिंगसाठी सोनी Liv ॲप किंवा या वेबसाइटच्या माध्यमातून मोबाइलवर ही या सामन्याचा आनंद क्रिकेट चाहते घेऊ शकतात. लोकमत.डॉट कॉमच्या माध्यमातूनही आम्ही सामन्यासंदर्भातील अपडेट्स देणार आहोत.
Web Title: Asia Cup 2025 Bangladesh vs Sri Lanka Head to Head T20I Stats And Records Know Live Streaming Where To Watch BAN vs SL 5th Match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.