Asia Cup 2018: Afghanistan set 250 runs target for Sri Lanka | Asia Cup 2018 : अफगाणिस्तानचे श्रीलंकेपुढे 250 धावांचे आव्हान
Asia Cup 2018 : अफगाणिस्तानचे श्रीलंकेपुढे 250 धावांचे आव्हान

ठळक मुद्देरहमतने 90 चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर 72 धावांची खेळी साकारली.

दुबई, आशिया चषक 2018 : रहमत शाहच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानमे प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेपुढे 250 धावांचे आव्हान ठेवले आहे.

  

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी 57 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पणअफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना श्रीलंकेच्या अकिला धनंजयाने बाद केले.

अफगाणिस्तानला पहिला धक्का बसल्यावर रहमत फलंदाजीला आला आणि आपल्या दमदार खेळीने त्याने अफगाणिस्तानला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. रहमतने यावेळी 63 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. रहमतने 90 चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर 72 धावांची खेळी साकारली.


दुशमंथा चमीराने यावेळी थिसारा परेराकरवी रहमतला झेलबाद केले.


Web Title: Asia Cup 2018: Afghanistan set 250 runs target for Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.