Amazing! The Indian batsman has hit just boundaries and sixes for century | कमाल! भारतीय फलंदाजाने फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावर झळकावले शतक
कमाल! भारतीय फलंदाजाने फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावर झळकावले शतक

मुंबई : एका खेळाडूने फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावर शतक झळकावल्याचे तुम्ही पाहिले नसेल. पण भारताच्या एका फलंदाजाने फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावर शतक पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारतामध्ये सध्या ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत मनीष पांडेने ही कमाल केल्याचे पाहायला मिळाले आहे. मनीषच्या या धडाकेबाज शतकाच्या जोरावर कर्नाटकच्या संघाला २५० धावांचा पल्लाही गाठता आला. मनीषने फक्त ५४ चेंडूंमध्ये १२९ धावांची खेळी साकारली. त्यामुळे कर्नाटकला २० षटकांमध्ये २५० धावा रचता आल्या.

सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत मनीष पांडेने झंझावाती फलंदाजी करताना १२९ धावा केल्या. या शतकामध्ये १२ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. त्यामुळे १२९ पैकी १०८ धावा मनीषने चौकार आणि षटकारांच्या जोरावर केल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Amazing! The Indian batsman has hit just boundaries and sixes for century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.