अजिंक्य रहाणेनंतर पूरग्रस्तांच्या मदतीला 'क्रिकेटचा देव'ही धावला...

कोल्हापूर, सांगलीसह देशभरातील अनेक ठिकाणांना पुराचा मोठा फटका बसला. अनेकांचे घर उध्वस्त झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 10:14 AM2019-08-14T10:14:41+5:302019-08-14T10:15:25+5:30

whatsapp join usJoin us
After Ajinkya Rahane, the 'god of cricket' Sachin Tendulkar also ran to help the flood victims | अजिंक्य रहाणेनंतर पूरग्रस्तांच्या मदतीला 'क्रिकेटचा देव'ही धावला...

अजिंक्य रहाणेनंतर पूरग्रस्तांच्या मदतीला 'क्रिकेटचा देव'ही धावला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : कोल्हापूर, सांगलीसह देशभरातील अनेक ठिकाणांना पुराचा मोठा फटका बसला. अनेकांचे घर उध्वस्त झाली.   पूरग्रस्तांच्या मदतीला अनेक सरकारी यंत्रणांसह अनेक सेवाभावी संस्थाही पुढे आल्या. मराठी कलाकारांसह, बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही मदतीचा हात पुढे केला. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणनेही सामाजिक भान जपताना कोल्हापूर व सांगलीतील लोकांना मदत केली. पूरग्रस्तांना मदत करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू असावा. रहाणेनंतर आता महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही पूरग्रस्तांना मदत केली आहे. त्यानं इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.

रहाणेने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पूरग्रस्तांचे सांत्वन करताना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानं लिहीले होते की,''त्यानं लिहीले की,'' आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा.''


मंगळवारी तेंडुलकरनेही ट्विट केले. तो म्हणाला,''भारतातील अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. पण, आता परिस्थिती हळुहळु पुर्वपदावर येत आहे आणि तेथील लोकांना मदतीची गरज आहे. मी माझ्याकडून मदत केली आहे. पंतप्रधान मदतनिधीमार्फत मी मदत केली आहे आणि तुम्हालाही आवाहन करत आहे.'' 

हेच खरं 'स्वच्छता अभियान', कोल्हापूरचा कचरा साफ करतायंत महापालिका आयुक्त 
स्वच्छ भारत मिशन अभियानावेळी हजारो सेलिब्रिटी हात पुढे आले होते. शेकडो नेते आणि लाखो कार्यकर्ते स्वच्छता मोहीम राबवत होते. भारत स्वच्छ करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच भारत स्वच्छ केला होता. मात्र, खऱ्या स्वच्छता अभियानाची गरज आता आहे. सांगली आणि कोल्हापूरातील पूरस्थिती ओसरल्यानंतर तेथील नागरिकांच्या आरोग्यासाठी, शहराच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवींचे हात पुढे येत आहेत.  

शहरातील महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दूषित पाणी तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये म्हणून स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असून फक्त पूरग्रस्त भागात 400 कर्मचारी अत्यावश्यक मशिनरीच्या सहाय्याने काम करीत आहेत. संपूर्ण शहरात सुमारे दीड हजार कर्मचारी स्वच्छतेच्या कामात योगदान देत असून एरव्ही एका शिफ्टमध्ये चालणारे काम आता दोन शिफ्टमध्ये सकाळी सहा ते सायंकाळी सहा असे अखंड बारा तास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कार्यात स्वत: महापालिका आयुक्तही हातात ग्लोज घालून रस्त्यावर उतरले आहेत. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Web Title: After Ajinkya Rahane, the 'god of cricket' Sachin Tendulkar also ran to help the flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.