दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स आणि त्याची पत्नी डॅनिएल डिव्हिलियर्स तिसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे आणि लवकरच त्यांच्या घरी तिसरा सदस्य येणार आहे. डॅनिएलनं मंगळवारी इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही गुड न्यूज दिली. त्यानंतर तिच्या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एबी आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. निवृत्ती घेताना त्यानं पत्नी आणि मुलांना वेळ देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले होते. पण, तो पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचा विचार करत आहे, परंतु कोरोना व्हायरसमुळे त्याचे हे स्वप्न लांबणीवर पडले आहे. डॅनिएलनं ''हॅलो बेबी गर्ल'' असे फोटोसह पोस्ट केली आहे.
डॅनिएलच्या या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी
अनुष्का शर्मा हिनं प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्कानं एबी आणि डॅनिएल यांचे अभिनंदन केलं आहे.
![]()
दरम्यान, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं 18 जुलैल तीन संघाच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन केलं आहे आणि त्यात एबी खेळणार आहे. तीन संघांमध्ये एकाच दिवशी सामना होईल. एक संघ उर्वरित दोन संघांविरुद्ध 6-6 षटकांच्या ब्रेकसह 12 षटके फलंदाजी करेल. संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाज फलंदाजी करू शकेल. पण, त्याची एकेरी धाव ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे त्याला केवळ दुहेरी धाव घ्यावी लागेल. प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटके टाकू शकतो. 12 षटकांत सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता घोषित केला जाईल. विजेत्या खेळाडूला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक दिले जाईल. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल. हा सामना 18 जुलैला होणार आहे.
ज्योतिरादित्य, सचिन पायलटनंतर कोण?... राहुल जी?; भारताच्या माजी क्रिकेटपटूची 'कमेंट' व्हायरल
25 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूची कोरोनावर मात; पत्नी अजूनही पॉझिटिव्ह
कौतुकास्पद! 15व्या वर्षी भारताला जिंकून दिलं ऐतिहासिक सुवर्ण अन् आता CBSE बोर्डात केली कमाल
ट्वेंटी-20 लीगचे वेळापत्रक जाहीर; स्मिथ, वॉर्नरच्या फटकेबाजीचा रंगणार थरार
इंग्लंडचा भारत दौरा स्थगित? IPL 2020 साठी चाललीय खटाटोप!