जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 23:23 IST2025-08-26T23:23:25+5:302025-08-26T23:23:52+5:30

मनोज जरांगे यांच्याबद्दल सोशल मिडीयात अपशब्द वापरल्याने मनोज जरांगे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले.

Youth lynched for posting offensive post about Jarange Patil; Youth beaten up by supporters | जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

पैठण : मनोज जरांगे यांच्याबद्दल सोशल मिडीयात अपशब्द वापरल्याने मनोज जरांगे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. समर्थकांनी अपशब्द वापरणाऱ्या तरुणाला गाठून अगोदर त्याचे कपडे फाडले. त्यानंतर तोंडाला काळ फासलं हा  प्रकार पैठण शहरातील बस स्थानका समोर मंगळवार रोजी चारच्या  सुमारास  घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. विदुर लगडे असं काळ फासण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रदीप ठोंबरे असं काळं फासणाऱ्या जरांगे समर्थकाचे नाव आहे. विशेष म्हणजे हे दोघेही मराठा समाजाचे आहेत .

विदुर लगडे या युट्यूब तसेच सोशल मीडियावर मनोज जरांगे यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ती पोस्ट जरांगे समर्थकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाली. विदुर लगडे हा चार साडेचारच्या सुमारास पैठण येथील एका हॉटेलमध्ये चहा घेत असताना प्रदीप ठोंबरे या ठिकाणी आपल्या आठ ते दहा कार्यकर्त्यासह येऊन जरांगे पाटलांबद्दल  पोस्ट व्हिडिओ का टाकला म्हणून लगडे यांच्या अंगावरील कपडे फाडले तसेच  काळे ऑईलचेहऱ्यावर अंगावर टाकून मनोज जरांगे च्या नावाने घोषणा दिल्या .घटनेमुळे चौकात मोठी गर्दी झाली. काही नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले .दरम्यान, या प्रकरणी पैठण पोलिसांना याबाबत विचारले असता पोलिस निरीक्षक महादेव गोमारे म्हणाले की, ती पोस्ट एक वर्षांपूर्वी केलेली आहे. आजचा जो प्रकार घडला तो आपसातील वादातून घडला असावा. या प्रकरणाचा तपास आम्ही करत आहोत  असं त्यांनी सांगितलं.

Web Title: Youth lynched for posting offensive post about Jarange Patil; Youth beaten up by supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.