लेकी सुसाट, प्रस्थापित गारद! छ. संभाजीनगरच्या महापालिकेत ‘यंगिस्तान’ महिला ब्रिगेडची 'एंट्री'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:15 IST2026-01-19T13:13:05+5:302026-01-19T13:15:04+5:30

शिक्षण, आरोग्य आणि महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य हे या पाचही नगरसेविकांच्या ‘अजेंड्या’वरचे मुख्य विषय आहेत.

'Youngistan' women's brigade entered in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation | लेकी सुसाट, प्रस्थापित गारद! छ. संभाजीनगरच्या महापालिकेत ‘यंगिस्तान’ महिला ब्रिगेडची 'एंट्री'

लेकी सुसाट, प्रस्थापित गारद! छ. संभाजीनगरच्या महापालिकेत ‘यंगिस्तान’ महिला ब्रिगेडची 'एंट्री'

- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर :
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा प्रस्थापितांना धक्का देत यंग ब्रिगेडने मैदान मारले. विशेषतः सर्वात तरुण पाच नगरसेवक म्हणून पाच महिलांनी गुलाल उधळला असून, ‘लोकमत’ने या नवनिर्वाचित नगरसेविकांशी संवाद साधला. शिक्षण, आरोग्य आणि महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य हे या पाचही नगरसेविकांच्या ‘अजेंड्या’वरचे मुख्य विषय आहेत. शहराच्या विकासात ही तरुण शक्ती नक्कीच मैलाचा दगड ठरेल.

निकालात सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे सर्वात तरुण ठरलेल्या पाच नगरसेवकांची. या सर्व महिला आहेत, हे विशेष. एमआयएमच्या जीनत बेगम पटेल, अल्मास खान, सुमय्या खान, जोहरा समीर आणि शिंदेसेनेच्या हर्षदा शिरसाट या ५ तरुण महिलांचा समावेश आहे.

जीनत बेगम पटेल (वय २५)
सर्वात तरुण नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर जीनत पटेल यांनी आपली प्राथमिकता स्पष्ट केली. ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या प्रभागात पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे. अतिक्रमणात अनेकांची घरे जाणार आहेत, त्यांना हक्काचा मोबदला मिळवून देणे ही माझी पहिली जबाबदारी असेल. विशेषतः धार्मिक स्थळांच्या जागांच्या संरक्षणासाठी मी आग्रही असेन. ज्या महिला घराबाहेर पडू शकत नाहीत, त्यांच्यासाठी रोजगाराचे व्यासपीठ उभारेन.

अल्मास खान (२६)
अल्मास खान म्हणाल्या, केवळ रस्ते-गटार म्हणजे विकास नाही. नशेखोरीच्या विळख्यातून तरुण पिढीला बाहेर काढणे आणि हाताला काम देणे, हे माझे लक्ष्य आहे. प्रभागातील एकही गृहिणी परावलंबी राहू नये, यासाठी मी कौशल्य विकास योजना राबवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करेन. मुलांना खेळण्यासाठी दर्जेदार उद्याने ही माझ्या प्रभागाची गरज आहे.

सुमय्या खान (२७)
अनुभवी ज्येष्ठांची साथ आणि तरुणांचा उत्साह घेऊन मी काम करणार आहे, असे सांगत सुमय्या खान यांनी शिक्षणावर भर दिला. त्या म्हणाल्या, प्रभागात नवीन शाळा, अंगणवाड्या आणि सुसज्ज आरोग्य केंद्रे उभारण्यावर माझा भर असेल. या दोन गोष्टी सुधारल्या तरच सामान्य माणसाचे जीवनमान उंचावेल.

हर्षदा शिरसाट(३०)
आपल्या प्रभागात मूलभूत सुविधा पुरवण्यासोबतच महिलांसाठी जास्तीत जास्त स्वच्छतागृहांची उभारणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, वाचनालयांची निर्मिती, उद्याने, खेळाचे मैदान विकसित करणे, महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणे या प्रमुख गोष्टी त्यांच्या अजेंड्यावर असतील.

Web Title : युवा महिलाओं ने छत्रपति संभाजीनगर चुनाव में स्थापित नेताओं को हराया

Web Summary : छत्रपति संभाजीनगर नगर निगम चुनावों में युवा महिला उम्मीदवारों ने शिक्षा, स्वास्थ्य और महिला आर्थिक सशक्तिकरण को प्राथमिकता दी। उनका उद्देश्य पानी की समस्याओं का समाधान करना, रोजगार के अवसर पैदा करना, बुनियादी ढांचे में सुधार और सुरक्षा बढ़ाना है, जो शहर के लिए महत्वपूर्ण प्रगति का वादा करता है।

Web Title : Young Women Sweep Chhatrapati Sambhajinagar Elections, Ousting Established Leaders

Web Summary : Young women candidates triumphed in Chhatrapati Sambhajinagar's municipal elections, prioritizing education, health, and women's economic empowerment. They aim to tackle water issues, create job opportunities, improve infrastructure, and enhance safety, promising significant progress for the city.