छ. संभाजीनगरात तीन माजी महापौर रिंगणात; जाणून घ्या एका क्लिकवर ८५९ उमेदवारांची यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:39 IST2026-01-03T16:38:49+5:302026-01-03T16:39:54+5:30
छत्रपती संभाजीनगरकरांनो चॉइस तुमची; ८५९ उमेदवारांतून निवडा ११५ नगरसेवक

छ. संभाजीनगरात तीन माजी महापौर रिंगणात; जाणून घ्या एका क्लिकवर ८५९ उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूकीत शुक्रवारी अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी चांगलेच भाव खात होते. त्यानंतरही विविध राजकीय पक्षांनी त्यांची 'मर्जी' राखली. सर्वाधिक ९१ अपक्षांनी झोन क्रमांक ७ मध्ये अर्ज मागे घेतले. सर्वांत कमी झोन क्रमांक १ मध्ये ३१ जणांनी माघार घेतली. दिवसभरात अर्ज मागे घेणाऱ्यांची संख्या ५५४ होती. ११५ जागांसाठी ८५९ उमेदवार लढत आहेत.

संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी गुरुवारपासूनच अपक्षांना माघार घेण्यासाठी फिल्डिंग लावली होती. अगोदर काही अपक्ष सापडतच नव्हते. सापडले तर भाव खात होते. उमेदवार, पक्षाच्या नेत्यांनी अनेक विनवण्या केल्या. भविष्यात संधी देण्याची आश्वासने दिली. विविध राजकीय पक्षांचे नेते अपक्षांना सोबत आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडत होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर उभे राहून हा सर्व खेळ सुरू होता. सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले आहेत. अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवाराचे गणित कधीही बिघडवू शकतात.
जाणून घ्या प्रभागनिहाय ८५९ उमेदवारांची यादी:

तीन माजी महापौर निवडणूक रिंगणात
महापालिका निवडणुकीत तीन माजी महापौर नशीब आजमावत आहेत. अनिता नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली आहे. उद्धवसेनेकडून माजी महापौर रशीद मामू निवडणूक रिंगणात आहेत.

प्रभागनिहाय अंतिम चित्र असे
प्रभाग क्रमांक- माघार- वैध उमेदवार
०३,०४, ०५- ३१- १०२
१५, १६, १७- ७४- ८८
६, १२, १३, १४- ४१- ९१
१, २,७- ५०- ९३
८, ९, १०, ११- ७३- १०७
२३, २४, २५- ५८- ९८
२१, २२, २७- ९१- १२४
२६, २८, २९- ७२- ७१
१८, १९, २०- ६४
एकूण- ५५४- ८५९