पैठणमध्ये सर्वाधिक कुपोषित बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 15:50 IST2020-10-05T15:48:58+5:302020-10-05T15:50:19+5:30
पैठण तालुक्यात सर्वाधिक १३५ तीव्र तर ४७५ मध्यम कुपोषित बालके आढळल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.

पैठणमध्ये सर्वाधिक कुपोषित बालके
औरंगाबाद : कोरोना संक्रमणाच्या काळात जिल्ह्यात ४९७ बालके तीव्र कुपोषित तर १९८३ बालके मध्यम कुपोषित आढळली. पैठण तालुक्यात सर्वाधिक १३५ तीव्र तर ४७५ मध्यम कुपोषित बालके आढळल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.
जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विभागाच्या माध्यमातून पर्यवेक्षिकांच्या देखरेखीत कुपोषित बालकांना अतिरिक्त आहार देणे सुरू आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत कुपोषणाचे प्रमाण घटलेले दिसेल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रसाद मिरकले यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रूग्णालयात दहा खाटांचे पोषण पुनर्वसन केंद्र गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते. यंदा जिल्हा रूग्णालय कोविड हॉस्पिटल झाल्याने ते केंद्र बंद आहे. हे केंद्र पुन्हा सुरू करण्याची गरज असल्याचे कुपोषित बालकांची आकडेवारी पाहून निदर्शनास येत आहे.