मांसाहारातून विषबाधा, एका महिलेचा मृत्यू तर १३ रुग्णालयात भरती; पैठणमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 18:41 IST2025-05-18T18:41:48+5:302025-05-18T18:41:57+5:30

रुग्णांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

Meat poisoning, one woman dies, 13 hospitalized; incident in Paithan | मांसाहारातून विषबाधा, एका महिलेचा मृत्यू तर १३ रुग्णालयात भरती; पैठणमधील घटना

मांसाहारातून विषबाधा, एका महिलेचा मृत्यू तर १३ रुग्णालयात भरती; पैठणमधील घटना

पैठण/दादासाहेब गलांडे- पैठण शहरापासून अगदी जवळ असलेल्या शहागड फाट्याजवळ वीट भट्टीव काम करणाऱ्या मजुरांमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर सहा बालकांसह सात कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर माहिती अशी की, शहागड फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत. या वीट भट्ट्यावर काम करण्यासाठी परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणावर कामासाठी आलेले आहेत. शनिवार( दि १७) रोजी रात्री वीटभट्टी कामगारासह लहान मुलांनी मासे, चिकन, अंडी, मटन खाल्याने रविवार रोजी सकाळी सहाच्या त्रास होण्यास सुरुवात झाली.

अन्नातून विषबाधा होऊन वीटभट्टीवर काम करणारी  ललिता प्रेमलाल पालविया (वय ३३ वर्षे) या महिलेचा या घटनेत मृत्यू झाला, असून सहा बालकासह 13 जणांवर पैठण येथील डॉ. विष्णु बाबर यांच्या साई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक संजय देशमुख अधिक तपास करत आहेत.

Web Title: Meat poisoning, one woman dies, 13 hospitalized; incident in Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.