महायुतीच्या गोंधळात राष्ट्रवादीला धक्का; जळगावात अभिषेक पाटील यांचा राजीनामा, “पक्षाची विक्री झाली” असा केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:47 IST2025-12-30T12:46:21+5:302025-12-30T12:47:42+5:30
Jalgaon Municipal Corporation Election: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

महायुतीच्या गोंधळात राष्ट्रवादीला धक्का; जळगावात अभिषेक पाटील यांचा राजीनामा, “पक्षाची विक्री झाली” असा केला आरोप
- सुनील पाटील
जळगाव - महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजप–शिंदे सेना–राष्ट्रवादी युती महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र, हे कोडे अद्याप सुटलेले नसतानाच हा राजीनामा आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राजीनामा देताना अभिषेक पाटील यांनी लोकमतचे बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विक्री झाली आहे, असा गंभीर आरोप करत थेट पक्ष नेतृत्वावर संधान साधले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने केवळ दोन ओळींचे राजीनामा पत्र देण्यात आले असून ते सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
जागा वाटपावरून निर्माण झालेल्या असंतोषातून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असून, या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत खदखद उघडपणे समोर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे जळगावच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.