पालकमंत्र्यांना हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करायचे होते; राजेंद्र जंजाळ यांचा थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:13 IST2026-02-12T13:11:27+5:302026-02-12T13:13:51+5:30

छत्रपती संभाजीनगरात मंत्री संजय शिरसाट विरुद्ध राजेंद्र जंजाळ; शिंदेसेनेतील वाद विकोपाला

Guardian Minister wanted to make Harshada Shirsat the Deputy Mayor; Rajendra Janjal's direct target | पालकमंत्र्यांना हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करायचे होते; राजेंद्र जंजाळ यांचा थेट निशाणा

पालकमंत्र्यांना हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करायचे होते; राजेंद्र जंजाळ यांचा थेट निशाणा

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्र्यांनी माझ्या उपमहापौरपदाच्या उमेदवारीला विरोध करायला नको होता. त्यांना हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करायचे होते, असा बॉम्बगोळा टाकतानाच कालचा जल्लोष माझा नव्हे तर तो कार्यकर्त्यांचा राग होता. त्यांच्या भावनांना मी कुठेतरी वाट मोकळी होऊ दिली, असे स्पष्टीकरण उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी बुधवारी दिले.

उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी महापालिकेसह शहरभर मोठा जल्लोष केला. पालकमंत्री संजय शिरसाट यांना डिवचण्यासाठी काही पोस्टर्सही झळकवले. यावर स्पष्टीकरण देताना जंजाळ यांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त बाॅम्बगोळा टाकला. नंतर ते म्हणाले की, शिरसाट आमचे नेते आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. लोकसभा निवडणूक आली, मी उमेदवारी मागितली तर त्यांनी तू अजून लहान आहेस म्हणून बोळवण केली. विधानसभेसाठी उमेदवारी मागितली तरी नको म्हणाले. आता उपमहापौरपदासाठी आम्ही सर्व निकषांत बसत असतानाही ते नाही, म्हणत असतील तर कार्यकर्त्यांना राग येणारच आहे. काल जल्लोषात सहभागी झालेल्यांमध्ये १५ पेक्षा अधिक पराभूत उमेदवार होते. त्यांच्या त्या भावना होत्या. त्या भावनांना मी कुठेतरी वाट मोकळी करून दिली. रात्री आठ वाजेपर्यंत हा जल्लोष सुरू होता, असेही त्यांनी नमूद केले.

पालकमंत्री शिरसाट आणि जंजाळ यांच्यातील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. शिंदेसेनेतील हा अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागला. भाजपने उपमहापौरपद शिंदेसेनेला देण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जंजाळ यांच्या नावाची घोषणा केली. पालकमंत्री शिरसाट यांनी उमेदवारीला विरोध दर्शविला होता. या वादामुळे शिंदेगटाने विभागीय आयुक्तांकडे अद्याप १३ नगरसेवकांची गट नोंदणीही केली नाही. मंगळवारी महापौर, उपमहापौर निवडणूक पार पडली. यावेळी शिरसाट यांनी हजेरी लावली. महापौर, उपमहापौर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छाही दिल्या. शिरसाट यांनी महापालिका सोडताच जंजाळ यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. महापालिकेचे मुख्यालय, परिसर, क्रांती चौक, पुंडलिकनगर रोड गुलालमय केले. या जल्लोषात शिरसाट यांना डिवचणारी काही पोस्टर्सही होती.

Web Title : जंजाल ने मंत्री पर शिरसाट को उप महापौर बनाने का आरोप लगाया।

Web Summary : राजेंद्र जंजाल का आरोप है कि मंत्री संजय शिरसाट हर्षदा शिरसाट को उप महापौर बनाना चाहते थे। जंजाल की जीत का जश्न कार्यकर्ताओं के गुस्से को दर्शाता है। शिंदे सेना में आंतरिक कलह बढ़ी।

Web Title : Janjal accuses minister of favoring Shirsat for deputy mayor post.

Web Summary : Rajendra Janjal alleges minister Sanjay Shirsat wanted Harshada Shirsat as deputy mayor. Janjal's victory celebrations reflected workers' anger. Internal strife within the Shinde Sena escalates.