Ganesh Visarjan: बाप्पाला विसर्जनास नेणारे वाहन कसे आहे, ‘आरटीओ’ ठेवणार नजर...
By संतोष हिरेमठ | Updated: September 8, 2022 18:44 IST2022-09-08T18:43:50+5:302022-09-08T18:44:22+5:30
सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत तांत्रिक तपासणी करून घ्यावी आणि तांत्रिक तपासणीमध्ये योग्य आढळून आलेल्या वाहनांचाच मिरवणुकीमध्ये समावेश करावा.

Ganesh Visarjan: बाप्पाला विसर्जनास नेणारे वाहन कसे आहे, ‘आरटीओ’ ठेवणार नजर...
औरंगाबाद : लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस जवळ आला आहे. गणेशभक्तांनी त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. विसर्जन मिरवणूकीत सहभागी वाहन कसे आहे, यावर आरटीओ कार्यालयाची शुक्रवारी नजर राहणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी आरटीओ कार्यालयातर्फे सर्व तालुक्याच्या ठिकाणी, पाचोड पोलीस स्टेशन येथे तसेच औरंगाबाद शहरामध्ये आरटीओ कार्यालय, हर्सुल पोलीस व एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशन येथे वाहन मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत तांत्रिक तपासणी करून घ्यावी आणि तांत्रिक तपासणीमध्ये योग्य आढळून आलेल्या वाहनांचाच मिरवणुकीमध्ये समावेश करावा. तपासणीमध्ये दोषी आढळून आलेली वाहने मिरवणुकीमध्ये समावेश करू नयेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी केले आहे.