Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये 'रशीद मामू' फॅक्टर कायम! प्रभाग ४ मध्ये उद्धवसेनेचा भगवा फडकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:00 IST2026-01-16T16:58:52+5:302026-01-16T17:00:41+5:30

अंतर्गत विरोध अन् विरोधकांची टीका पचवत रशीद मामू विजयी

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026: Rashid Mamu wins despite internal opposition and criticism from opponents; Uddhav Sena's saffron party shines in Ward 4! | Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये 'रशीद मामू' फॅक्टर कायम! प्रभाग ४ मध्ये उद्धवसेनेचा भगवा फडकला!

Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये 'रशीद मामू' फॅक्टर कायम! प्रभाग ४ मध्ये उद्धवसेनेचा भगवा फडकला!

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ च्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. उद्धवसेनेचे उमेदवार आणि माजी महापौर रशीद मामू यांनी या प्रभागातून विजय मिळवत आपल्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. रशीद मामू यांचा हा विजय उद्धवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि महायुतीच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

रशीद मामू यांनी निवडणुकीपूर्वी अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने उद्धवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, या प्रवेशाला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा तीव्र विरोध होता. खैरेंनी जाहीरपणे रशीद मामू यांना तिकीट मिळू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र, अंबादास दानवे यांनी थेट 'मातोश्री'वर नेऊन मामूंचा पक्षप्रवेश घडवून आणला आणि त्यांना तिकीट मिळवून देण्यातही पुढाकार घेतला. आजच्या विजयाने दानवे यांचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले असून खैरेंसाठी हा एक राजकीय धक्का मानला जात आहे.

विरोधकांच्या टीकेला उत्तर 
निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदेसेनेने उद्धवसेनेवर 'मामूसेना' झाल्याची जहरी टीका केली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशाला लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, रशीद मामू यांनी प्रचारादरम्यान संयम राखत जनसंपर्कावर भर दिला. आजच्या निकालाने प्रभाग ४ मधील मतदारांनी मामूंच्या कामावर आणि अनुभवावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा सभागृहात पाठवले आहे. या विजयामुळे रशीद मामू यांचे शहरातील राजकारणातील स्थान अधिक बळकट झाले असून, उद्धव सेनेतील अंबादास दानवे गटाची ताकदही वाढली आहे.

Web Title : रशीद मामू फैक्टर बरकरार; उद्धव सेना ने छत्रपति संभाजीनगर वार्ड जीता!

Web Summary : छत्रपति संभाजीनगर के वार्ड 4 में रशीद मामू की जीत ने आलोचकों को गलत साबित किया, उद्धव सेना और अंबादास दानवे के प्रभाव को मजबूत किया, आंतरिक विरोध और महायुति के हमलों के बावजूद। उनकी जीत दानवे के समर्थन को प्रमाणित करती है और उनकी राजनीतिक स्थिति को बढ़ाती है।

Web Title : Rashid Mamu Factor Prevails; Uddhav Sena Wins Chh. Sambhajinagar Ward!

Web Summary : Rashid Mamu's victory in Chh. Sambhajinagar's Ward 4 defied critics, strengthening Uddhav Sena and Ambadas Danve's influence despite internal opposition and Mahayuti's attacks. His win validates Danve's support and bolsters his political standing.