छत्रपती संभाजीनगरात भाजपने ५० माजी नगरसेवकांना उतरविले मैदानात; १३ आयातांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:15 IST2025-12-31T18:11:07+5:302025-12-31T18:15:02+5:30

मनपाच्या कुरूक्षेत्रात सर्वाधिक उमेदवार भाजपने उतरविले आहेत.

BJP fields 50 former corporators in Chhatrapati Sambhajinagar; 13 imported candidates | छत्रपती संभाजीनगरात भाजपने ५० माजी नगरसेवकांना उतरविले मैदानात; १३ आयातांना संधी

छत्रपती संभाजीनगरात भाजपने ५० माजी नगरसेवकांना उतरविले मैदानात; १३ आयातांना संधी

छत्रपती संभाजीनगर : महायुती तुटल्यानंतर तीन तासांत भाजपने ९६ उमेदवारांना बी : फॉर्म (पक्षाच्या चिन्हावर अधिकृतरीत्या लढण्याची मुभा असलेले पत्र) दिले. एकूण ५० माजी नगरसेवकांना भाजपने मैदानात उतरविले आहे. त्यात उद्धवसेना व इतर पक्षांतून आलेल्या १३ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. ४६ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. १९ ठिकाणी भाजपला उमेदवार मिळाले नाहीत. मनपाच्या कुरूक्षेत्रात सर्वाधिक उमेदवार भाजपने उतरविले आहेत. पालिकेच्या रणधुमाळीत जास्तीचे उमेदवार देत भाजपने मोठा पक्ष म्हणून बाजी मारली.

निवड समितीही उमेदवारीत
मागील दहा दिवसांत पक्षांत जे आले, त्या सर्वांना उमेदवारी मिळाली आहे. यात पाच उमेदवारांचा समावेश आहे. जे काँग्रेस, उद्धवसेनेतून आचारसंहिता लागल्यानंतर भाजपमध्ये आले. परिणामी, भाजपमधील निष्ठावंतांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. निवडणूक प्रमुख म्हणून पद असताना ऐनवेळी अर्ज भरला. समन्वय समिती सदस्यांनाही उमेदवारी मिळाली.

९६ जागांवर उमेदवार
९६ जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. प्रभाग क्र.२८ मध्ये तीन ठिकाणी, प्रभाग क्र. १४ मध्ये चार, प्रभाग क्र. १३ मध्ये चार, प्रभाग क्र. १२ मध्ये चार, तर प्रभाग क्र. ५ मध्ये चार असे एकूण १९ ठिकाणी भाजपला उमेदवार मिळाले नाहीत.

गुगल लोकेशनवर वाटले बी-फॉर्म
अंतिम केलेल्या उमेदवारास भाजप नेत्यांनी गुगल लोकेशन टाकून कोणत्या कार्यकर्त्यांच्या हस्ते बी-फॉर्म मिळेल, हे कळविले. कुणाच्याही हाती बी-फॉर्म पाठविले नव्हते. पक्षाच्या जबाबदार व्यक्तीकडेच बी-फॉर्म देण्यात आले. ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांना गुगल लोकेशन दिले.

मध्यरात्री २नंतर सर्वांना फोन
भाजप मध्यवर्ती प्रचार कार्यालयातून मध्यरात्री २ वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी तयार राहण्याचे सांगण्यात आले होते. सकाळी ९ वाजता उमेदवारांनी झोन कार्यालय गाठून उमेदवारी अर्ज भरले. तसेच बी-फॉर्म आणण्यासाठी उमेदवार स्वत: ज्या ठिकाणी सांगितले होते, तेथे पोहोचले.

३५ ते ४५ वयाचा नारा नावापुरताच
३५ ते ४५ वयाच्या उमेदवारांना प्राधान्य द्या, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुचविले होते. परंतु सुमारे ३० उमेदवार हे ५० ते ७० वयातील आहेत. ३५ ते ४५ वयातील उर्वरित उमेदवारांची संख्या ४० च्या आसपास आहे. २५ ते ३५ वयातील २६ उमेदवार आहेत.

Web Title : भाजपा ने 50 पूर्व पार्षदों को उतारा, 13 आयातितों को मौका दिया

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में, महायुति टूटने के बाद भाजपा ने 50 पूर्व पार्षदों और अन्य दलों से 13 सहित 96 उम्मीदवारों को नामांकित किया। कई जगहों पर उम्मीदवार कम थे और प्रपत्र वितरण के लिए गूगल लोकेशन पर निर्भर रहे। कुछ वफादारों ने नए प्रवेशकों पर असंतोष व्यक्त किया।

Web Title : BJP Fields 50 Ex-Councilors, Gives Chance to 13 from Other Parties

Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, BJP nominated 96 candidates, including 50 ex-councilors and 13 from other parties, following the Mahayuti split. Many faced candidate shortages and relied on Google locations for form distribution. Some loyalists expressed discontent over the new entrants.