एकनाथ शिंदेंच्या निर्णयाने पालकमंत्री शिरसाट यांना झटका; राजेंद्र जंजाळ होणार उपमहापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 20:22 IST2026-02-06T20:21:33+5:302026-02-06T20:22:04+5:30

शिरसाटांना अंधारात ठेवून एकनाथ शिंदे यांनी केले राजेंद्र जंजाळांचे नाव निश्चित

A setback for Guardian Minister Shirsat; Rajendra Janjal will be the Deputy Mayor, Eknath Shinde's decision | एकनाथ शिंदेंच्या निर्णयाने पालकमंत्री शिरसाट यांना झटका; राजेंद्र जंजाळ होणार उपमहापौर

एकनाथ शिंदेंच्या निर्णयाने पालकमंत्री शिरसाट यांना झटका; राजेंद्र जंजाळ होणार उपमहापौर

छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ यांची निवड करण्याचे आदेश दिले. मात्र ही निवड करताना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना अंधारात ठेवण्यात आल्याने ते नाराज झाले. यातून त्यांनी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या गटाच्या ९ नगरसेवकांची बैठक घेतली. दुसरीकडे भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेकडेही पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली.

महापालिका निवडणुकीत भाजपने महापौरपद स्वत:कडे तर उपमहापौरपद शिंदेसेनेला देण्याचा निर्णय घेतला. महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेने १३ जागा जिंकल्या आहेत. मात्र या नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गटाकडे ९ नगरसेवक तर आ. जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या गटात ४ नगरसेवक आहेत. शिरसाट यांना उपमहापौरपद आपल्या गटातील माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना द्यायचे होते. यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौरपदी निवड करण्याचे आदेश दिले. 

जंजाळ यांची निवड करुन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना एक प्रकारे धक्काच दिला. जंजाळ यांच्या निवडीचे पत्र घेऊन पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विलास पारकर हे सकाळीच छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले. पारकर यांनी हे पत्र भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांना दिले. आपल्याला अंधारात ठेवत पक्षांतर्गत विरोधक राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौरपद दिल्याने पालकमंत्री शिरसाट नाराज झाले. या नाराजीतून त्यांनी त्यांच्या बंगल्यावर ९ नगरसेवकांची बैठक बोलावली. भाजप कार्यालयात महापौर आणि उपमहापौर उमेदवारांची नावे घोषित करण्यासाठी पत्रकार परिषदेेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेकडे पालकमंत्री व त्यांच्या गटातील नगरसेवकांनी पाठ फिरवली. शिंदेसेनेकडून केवळ आ. प्रदीप जैस्वाल, संपर्कप्रमुख पारकर आणि राजेंद्र जंजाळ आणि त्यांच्या गटाचे नगरसेवक उपस्थित होते.

पक्षाच्या आदेशाचे पालन
पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक आमच्याकडे आले होते. बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर केली. पक्षाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले. उपमहापौर, महापौर पदासाठी १० फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. केवळ उमेदवारी अर्ज भरायचे, म्हणून मी पत्रकार परिषदेकडे गेलो नाही.
- संजय शिरसाट, पालकमंत्री.

Web Title : एकनाथ शिंदे के फैसले से पालक मंत्री शिरसाट को झटका; राजेंद्र जंजाळ बनेंगे उपमहापौर

Web Summary : एकनाथ शिंदे द्वारा राजेंद्र जंजाळ को उपमहापौर नियुक्त करने के फैसले से पालक मंत्री शिरसाट नाराज़। शिरसाट ने अपने समूह के पार्षदों के साथ बैठक की और प्रेस कॉन्फ्रेंस का बहिष्कार किया। जंजाळ का चयन पार्टी के भीतर की गतिशीलता को दर्शाता है।

Web Title : Eknath Shinde's decision shocks Guardian Minister Shirsat; Rajendra Janjal to be Deputy Mayor

Web Summary : Shinde's decision to appoint Rajendra Janjal as Deputy Mayor sidelined Guardian Minister Shirsat, causing discontent. Shirsat held a meeting with his group's corporators and boycotted the press conference. Janjal's selection reflects internal party dynamics and Shinde's authority.