‘भारत जोडो यात्रा’ जिथे गेली तिथे काँग्रेस फुटली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:02 PM2024-03-27T12:02:27+5:302024-03-27T12:06:23+5:30

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप व महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

Wherever 'Bharat Jodo Yatra' went, Congress split, Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized | ‘भारत जोडो यात्रा’ जिथे गेली तिथे काँग्रेस फुटली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

‘भारत जोडो यात्रा’ जिथे गेली तिथे काँग्रेस फुटली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

चंद्रपूर : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ज्या राज्यांमध्ये गेली तिथे काँग्रेस फुटली. नेत्यांनी काँग्रेसला सोडले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी चंद्रपुरात केले.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप व महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा लढा आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांना दिलेले प्रत्येक मत हे मोदींना दिलेल्या मतासारखे राहणार आहे. 

विकासावर लढतोय : मुनगंटीवार 
माझ्यासाठी साऱ्या जाती समान आहेत. ही निवडणूक जनतेची आहे. माझी लढाई काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध नाही तर विकासासाठी आहे. जात किंवा सहानुभूतीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढतोय, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला. मुनगंटीवार यांनी  मंगळवारी मिरवणुकीतून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपले नामनिर्देशन दाखल केले. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत मुनगंटीवार बोलत होते. 

काँग्रेसच्या प्रतिभा धानाेरकरांचेही नामांकन
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनीही मंगळवारी नामांकन अर्ज दाखल केला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्याने माजी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना रविवारी रात्री उशिरा काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली होती.
धानोरकर यांच्या समर्थनार्थ चंद्रपुरात बुधवारी महारॅली काढण्यात येणार आहे.

Web Title: Wherever 'Bharat Jodo Yatra' went, Congress split, Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.