मोठी दुर्घटना! कानपाजवळ भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, १ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 18:12 IST2023-06-04T18:10:21+5:302023-06-04T18:12:28+5:30
नागपूर येथील एक कुटुंब एमएच ४९ - बीआर २२४२ या अल्टो कारने नागपूरकडून नागभीडकडे येत होते.

मोठी दुर्घटना! कानपाजवळ भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, १ गंभीर
नागभीड(चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील कानपाजवळ ट्रॕव्हल्स आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार तर १ जण गंभीर जखमी आहे. मृतात २ पुरूष व ३ महिलांचा समावेश आहे. ही घटना रविवारी ३ वाजताच्या सुमारास घडली. मृतक नागपूर येथील रहिवासी आहेत. मृतकांची ओळख अद्याप पटली नाही.
नागपूर येथील एक कुटुंब एमएच ४९ - बीआर २२४२ या अल्टो कारने नागपूरकडून नागभीडकडे येत होते. त्याचवेळी एआरबी कंपनीची एमएच ३३ टी २६७७ ही ट्रॕव्हल्स नागभीडवरून नागपूरला जात होती. ट्रॕव्हल्सने कानपा गाव ओलांडल्यानंतर नागभीडकडे येत असलेल्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने ट्रॕव्हल्सला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, या धडकेत कारच्या समोरील भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. मागच्या सीटवर बसलेली एक महिला धक्क्याने एकदम समोर आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनस्थळी पोचले. गॕस कटरने दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढावी लागली.