निवृत्त पोलिसाच्या घरी चोरट्यांचा डल्ला, दहा तोळे सोने लंपास

By राजेश मडावी | Updated: April 18, 2023 14:42 IST2023-04-18T14:41:29+5:302023-04-18T14:42:56+5:30

वरोरा शहरातील बावने लेआउटमधील घटना

Thieves looted ten tolas of gold from retired policeman's house at warora | निवृत्त पोलिसाच्या घरी चोरट्यांचा डल्ला, दहा तोळे सोने लंपास

निवृत्त पोलिसाच्या घरी चोरट्यांचा डल्ला, दहा तोळे सोने लंपास

चंद्रपूर : निवृत्त पोलिसाच्या घराचे मागील दार तोडून कपाटातील दहा तोळे सोने व रोख २ हजार ५०० रूपये अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना वरोरा शहरातील बावने लेआउटमध्ये मंगळवारी सकाळी उघडकीस आली.   

बावणे लेआउटमध्ये निवृत्त पोलीस घनश्याम निमसटकर आपल्या कुटुंबियांसोबत राहतात वरच्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहतो. १७ एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी वरच्या मजल्याचे दार तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील दहा तोळे सोन्याचे दागिने व अडीच हजार रुपये लंपास केले. वरोरा पोलिसांनी ठसे तज्ज्ञांकडून नमुने घेतले व परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेजची तपासणी केली. परंतु चोरट्यांचा सुगावा लागला नाही.

Web Title: Thieves looted ten tolas of gold from retired policeman's house at warora